बेरोजगार संघर्ष समितीचा उपोषणाचा ईशारा
मालेगाव/नांदेड| तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत असलेल्या मालेगाव ग्रामपंचायत सचिवालयाचा व्यापारी गळ्यांची मुदत ३० मार्च रोजी संपली आहे. लिलावासाठी ग्रामपंचायत ने नोटीस काढली ३० तारखेपर्यंत बोली लावण्यासाठी रक्कम २० हजार भरण्याची मुदत ठेवली खरी. परंतू नोटीस काढल्यानंतर ३० तारखे पर्यंत ग्रामविकास अधिकारी व कारकून रक्कम स्विकारन्यासाठी कार्यालयात उपस्थित नव्हते.
सरपंच उपस्थित असताना त्यांनी रक्कम स्विकारली नाही. त्यामुळे बोली लावण्यासाठी बेरोजगार तरुणांना रक्कम भरता आली नाही. जाणीव पूर्वक पूर्वीचाच गाळे धारकांना देण्याचा हेतूने ग्रामविकास अधिकारी संजय नीलमवार व कारकून उपस्थित राहिले नाही. त्यामुळे बेरोजगार तरुणांवर अन्याय झाल्याचा आरोप बेरोजगार संघर्ष समितीचे अध्यक्ष सुभाशिष कामेवार यांनी केला.
तसेच गेल्या 20 वर्षा पासून शासनाचा कराराची पायमल्ली करून पोट भाडेकरू ठेवलेल्या गाळे धारकांवर फसवनुकीचा फौजदारी गुन्हा नोंद करुन 20 वर्ष ज्यादा दराने ईतरांकडुन घेतलेल्या अनामत रक्कम व भाडे वसुली शासनाने मुळ गाळे धारकां कडुन वसुल करन्याची मागनी ही निवेदनात करण्यात आली आहे. तात्काळ कार्यवाही न केल्यास 7 एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरन उपोषण करन्याचा ईशारा समितीने दिला आहे.
निवेदनावर सुभाशिष कामेवार, बबलु तिम्मेवार, ओमप्रकाश बुट्टे,देवानंद वाघमारे, दशरत स्वामी, कोंडीबा वाघमारे, पिंटु तारू, मारोती ईंगोले , माधव स्वामी, बंडु स्वामी, नागेश फुलारी, श्रीकांत राजेवार, अमोल सावंत,शशिकांत सावंत,मनोज शेळके आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रति पालकमंत्री अशोकराव चव्हाण तसेच विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना देन्यात आल्या.