राज्यात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा- उपमुख्यमंत्री अजित पवार -NNL


मुंबई।
 महाराष्ट्रवासियांनी सर्व सण-उत्सव शांततेनेजातीय-धार्मिक सलोखा राखून साजरे केले पाहिजेत. आपापसातले प्रश्न सामोपचारानेसहकार्याच्या भूमिकेतून सोडवले पाहिजेत. शांतताकायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा पोलिसांवर ताण येतोसर्वसामान्य नागरिकांना किंमत मोजावी लागतेहे लक्षात घेऊन राज्यात शांतताकायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीसर्वोच्च न्यायालयाने ध्वनीक्षेपकासंदर्भात दिलेला निर्णय  सर्वांसाठी बंधनकारक असून त्यासंदर्भात केंद्र सरकार त्यांच्या तर राज्य सरकारे त्यांच्या पद्धतीने अंमलबजावणी करतील. राज्याचा गृहविभाग नियमकायद्यानुसारच कार्यवाही करेल. कायद्यापेक्षा वेगळी भूमिका घेणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊनसर्वांच्या सहकार्याने एक चांगला मार्ग निघावाअसा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. राज्यात शांतताकायदा-सुव्यवस्थाजातीय सलोखा राहावासौहार्दाचे वातावरण बिघडू नयेयासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आणि नागरिकांनी सहकार्य करावेअसे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

राज्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात आयोजित सर्वपक्षीय बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलसार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणपर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेनगरविकास मंत्री एकनाथ शिंदेपरिवहन मंत्री अनिल परबमुंबईचे पालकमंत्री अस्लम शेखशेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटीलबहुजन‍‍ विकास आघाडी पक्षाचे हितेंद्र ठाकूरलोकभारती पक्षाचे आमदार कपिल पाटीलआमदार प्रणिती शिंदेआमदार क्षितीज ठाकूरमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळा नांदगावकरनितीन सरदेसाईसंदीप देशपांडेसमाजवादी पक्षाचे रईस पठाणएमआयएमचे वारिस पठाणवंचित बहुजन पक्षाच्या रेखा ठाकूरआम आदमी पक्षाच्या प्रिती मेननमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उदय नारकरआरपीआय (गवई गट) राजेंद्र गवई आदींसह विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

कायदा सर्वांसाठी समान - गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले कीध्वनीक्षेपाबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्व राज्यांसाठी बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधारे राज्य शासनाने जुलै 2017पर्यंत वेळोवेळी शासननिर्णय जारी केले आहेत. त्या शासननिर्णयांची अंमलबजावणी सुरु आहे. राज्यात शांतताकायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे ही गृहविभागाची प्राथमिकता आहे. समाजात तेढ वाढेलकायदा-सुव्यवस्था बिघडेलअशी वक्तव्ये कुणी करु नयेत. कायदा सर्वांसाठी समान असूनकुणीही कायद्याचा भंग करु नये. आजच्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांची मते जाणून घेण्यात आली आहेत. ती विचारात घेऊन राज्य शासन योग्य तो निर्णय घेईल. शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्यात शांतताकायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावेअसे आवाहनही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. यावेळी  बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी मनोगते व्यक्त केली.      

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी