यावेळी मंत्री जयंत पाटील,मंत्री धनंजय मुंढे यांनी या आ.अमोल मिटकरी यांना साथ दिली,त्यामुळेच हा जातीयवाद पेरण्याचा विषय लोकप्रतिनिधी मध्ये आला असून या जातीयवादी वक्तव्य करत चमकोगिरी करू पाहणाऱ्या लोकप्रतिनिधीवर कडक कारवाई झालीच पाहिजे. आ.अमोल मिटकरी यांनी पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांची माफी मागितली तर पाहिजेच पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी या वादग्रस्त लोकप्रतिनिधीचा राजीनामा घेतला पाहिजे.
तसेच जातीयवाद पेरणारे लोकप्रतिनिधी माफी मागणार नसतील आणि लवकरात लवकर कारवाई केली नाही तर या लोकप्रतिनिधीला राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात फिरकू देणार नाही,हा समस्त संतप्त पुरोहित व ब्राह्मण समाजाचा इशारा आहे. असे संतप्त मत शौर्य परशुराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गजानन गुरू कळगावकर यांनी व्यक्त केले.
या वादग्रस्त वक्तव्याविषयी कठोर कारवाई व्हावी,याकरिता शौर्य परशुराम प्रतिष्ठानचे शिष्ट मंडळ सत्तेतील ज्येष्ठ नेते/मंत्री/पालकमंत्री अशोकराव चव्हाण व जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पा.चिखलीकर या दोघांचीही भेट घेऊन राजीनाम्याची मागणी करणार आहे -वे.मू.गजानन गुरू कळगावकर अध्यक्ष - शौर्य परशुराम प्रतिष्ठान