सिडको येथील संत रविदास मंदिरात भरगच्च आईच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त किर्तन, रक्तदान -NNL

वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी प्रेरणा मिळावी म्हणून "श्यामची आई"चे वाटप"

नवीन नांदेड।
आदर्श माता म्हणून समाज ज्यांची प्रेरणा घेतो, त्यापैकी आधुनिक काळातील एक माता म्हणून उस्माननगर येथील स्व.सुंदरबाई (लक्ष्मी) नारायणराव सोनटक्के यांचा प्रकर्षाने उल्लेख केला जातो.यांचा प्रथम पुण्स्मरण दिन (दि.२४एप्रिल) रोजी रविवारी सिडको, नांदेड येथील श्री संत रविदास मंदिर येथे साजरा करण्यात आला. त्यानिमित्त श्री रविदास महाराज मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.ब्लड बँकेचे

श्री गुरू गोविंद सिंगजीचे चेअरमन डाॅ.बोरुळकर व सदस्य नागेश सोनटक्के,डाॅ. अवतारसिंग सोडी यांनी परीश्रम घेतले.सदरिल कार्यक्रम म्हणजे मराठवाड्यातच काय तर महाराष्ट्रात नवा पायंडा पाडला असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले.तसेच वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी,वाचनास प्रेरणा मिळावी या उद्देशाने सानेगुरुजी लिखित "श्यामची आई" या पुस्तकाचे उपस्थितांना वाटप करण्यात आले. तत्पूर्वी ह.भ.प.महेंद्र महाराज म्हस्के पुसदकर यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते.अतिशय माधुर्यपुर्ण, गोड व रसाळ वाणीतून श्रोत्यांची मनं जिंकली व श्रोतेही भारावून गेले.यानंतर लगेच स्वरूची भोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला.यावेळी पुणे,औरंगाबाद,लातूर सह नांदेड जिल्ह्यातील नातेवाईक व मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुणे येथील अधिकारी बी.एन.सोनटक्के यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा दुग्धशर्करा योग ही यावेळी घडून आला.प्रशासनात उल्लेखनीय कार्य करून निष्कलंकपणे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार करून त्यांना अनेकांनी शाल,पुष्पहार,पुष्प गुच्छ देऊन दाम्पत्यांचा सर्हदय सत्कार केला.मनोगत व्यक्त करतांना, अनेकांचे र्हदय भरून आले. यावेळी बालाजी सोनटक्के सेवा निवृत पोलीस अधिकारी,औरंगाबाद,व्यंकटराव दुधंबे सामाजिक कार्यकर्ते ऊदोजक नांदेड,अविराजे निंबाळकर संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र आयर्न सेना लातूर,डाॅ. प्रा.शिवाजी सोनटक्के उपप्राचार्य रसीका महाविद्यालय देवणी,डाॅ.प्रा.अशोक कोलंबीकर परभणी,व्यंकटराव सोनटक्के प्रगतीशील शेतकरी तथा माजी सैनिक यांसह सामाजिक, शैक्षणिक,अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या अनेकांची सत्कार सोहळा कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी