शिवणी, प्रकाश कार्लेवाड। किनवट तालुक्यातील शिवणी पासुन चार किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या दयाल धानोरा तांडा येथे 23 च्या मध्यरात्रीला विजेच्या कडकडासह जोराच्या हवेसहपाऊस झाला दयाल धानोरा तांड्यातील गुराखी धावजी डोहीफोडे अापल्या गायी म्हशीं चा कळप चारण्यासाठी राणात घेऊन जात असताना गावा लागत असलेल्या नाल्याजवळच्या विद्युत खांबावरून तुटून पडलेल्या तारामुळे चरण्यास जाणाऱ्या दोन म्हशी व एका गाईला विद्युत प्रवाह ताराचा शॉक लागून जागीच होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज रविवार सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली.यात विध्युत मंडळाच्या हलगर्जी पणामुळे सुमारे एक लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या जनावरे दगावली असून पशुपालकांनी विद्युत महावितरण कंपनी कडे नुकसान भरपाई मिळावी ह्या साठी लेखी अर्ज सादर केले आहे.
काल शनिवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास शिवणी व परिसरात अनेक ठिकाणी वारा वादळ व पाऊस झाला.ह्यात शिवणी परिसरातील मौजे दयाल धानोरा तांडा येथील एल.टी. लाईनचे विद्युत प्रवाह तार तुटुन जमीवर पडले होते यात दोन म्हशी व एक गाय जागेवरच हेरपळत असताना गुराकाच्या निदर्शनास आले. बघता बघता यात दोन दुधाळ म्हैस व एक गाय यास तुटून पडलेल्या जिवंत विद्युत प्रवाह जनावरांना लागताच यात पशुपालक धावजी डोहीफोडे, मदन रतन राठोड, व दत्ता जानु पवार, ह्याची प्रत्येकी एक म्हैस व एक गाय असे एकून तीन पाळीव जनावरांचे शॉक लागून मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असून वरील पशुपालक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई साठी महावितरण कंपनी कडे व इस्लापुर पोलीस ठाणे येथे लेखी निवेदन दिले आहे.