फिरत्या प्रयोग शाळा वाहनाचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन -NNL


नांदेड|
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विविध विकास  कामे हाती घेतली जातात. यात डांबरी रस्त्यांपासून सिमेंटचे रस्ते, पूल, इमारती आदी बांधकामांचा समावेश असतो. शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशाप्रमाणे ही कामे होण्यासाठी दक्षता व गुण नियंत्रण विभाग नांदेड येथे कार्यान्वित करण्यात आला आहे. 

तथापि असंख्य कामे ही दुर्गम भागात व मुख्यालयापासून दूर असल्याने अशा कामांची गुणवत्ता ही जागेवरच तपासता यावी यादृष्टिने एक गुणवत्ता तपासणी वाहन तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या होत्या. या सूचनेनुसार नांदेड विभागासाठी एक अद्ययावत गुणवत्ता तपासणी वाहन तयार करण्यात आले.

तपासणीचे सर्व निकष शास्त्रोक्त दृष्ट्या परिपूर्ण व्हावेत यादृष्टिने आवश्यक ती सर्व अत्याधुनिक यंत्रसामुग्री या वाहनात बसविण्यात आली आहे. संबंधित तज्ज्ञ हे आता प्रत्यक्ष फिल्डवर जावून कामांच्या गुणवत्तेवर नियंत्रण व दक्षता घेतील. या वाहनाचे उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी