रेणुकाई क्रिटीकल केअर सेंटर ॲन्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचा उपक्रम
एकत्रित महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन PM-JAY आरोग्य योजने अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती रेणुकाई चे संचालक डॉ. निलेश बास्टेवाड यांनी दिली..आरोग्य धन संपदा हा रयतेचा अधिकार जन आरोग्य हा जनतेचा आधार या घोषवाक्यासह प्रत्येक व्यक्तीला उत्तम आरोग्याचा अधिकार असून या शिबीरात येणाऱ्या प्रत्येकाची आरोग्यतपासणी करण्यात येणार आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत ९७२ आजारांवर मोफत उपचार उपलब्ध आहेत आणि १३१ पाठपुरावा सेवा समाविष्ठ केलेल्या आहे. या योजनेअंतर्गत मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले आहे. या शिबीरामध्ये मोफत तपासणी आणि निदान केले जाणार असुन, आपण शिबीराचा लाभ घेऊन आपण आपल्या कुटूंबातील सदस्यांची तपासणी करून घ्यावी असे आवाहन डॉ. निलेश बास्टेवाड यांनी केले आहे.
या शिबीरामध्ये वरील पैकी ९७२ आजारांपैकी कुठल्याही प्रकारचे व्याधीनिदान झाल्यास योजनेच्या मान्यता प्राप्त रुग्णालयामध्ये उत्तम प्रकारची मोफत वैद्यकिय सेवा उपलब्ध होईल. या योजनेअंतर्गत कुटूंबाची एकत्रित वार्षिक उत्पन्न रू. १ लक्ष किंवा त्यापेक्षा कमी आहे. अशा कुटूंबाच्या (दारिद्रय रेषेखालील पिवळ्या शिधापत्रिका धारक, आधार कार्ड धारक) या योजनेत समावेश आहे. खालील व्याधीवर मोफत वैद्यकीय उपचार केले जातील.
उदा. हृदयविकार, अॅक्सीडंट मुतखडा उपचार व शस्त्रक्रिया , जनरल सर्जरी , अर्धागवायु (लकवा) ,दमा मेंदुज्वर , रक्तदाब व रक्ताच्या सर्व प्रकाराचे निदान व उपचार थायरॉईड मधुमेह, विष बाधा व सर्पदंश रुग्णांचे निदान व उपचार , अस्थीरोग (फॅक्चर) निदान व उपचार मुत्रपिंड व मुत्रमार्ग विकार कॅन्सर, क्षयरोग (टिबी) अशा दुर्धर आजारांवरही उपचार केले जातात व सदरील योजने अंतर्गत हे उपचार रेणुकाई हॉस्पीटल येथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.
माहूर येथील आरोग्य तपासणी शिबीरात डॉ. निलेश बास्टेवाड, एम. डी. मेडिसीन, डॉ. सि. जे. बास्टेवाड, स्त्रिरोग विभाग, डॉ. छाया गवाले,अतिदक्षता व मेडीसीन विभाग, डॉ. प्रशांत मेरगेवाड , डॉ. सोपान जाधव हे सेवा देणार आहेत तसेच सदरील शिबीर हे दि.२०/०४/२०२२ रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत होणार आहे शिबीरात तपासणी साठी येतांना सोबत राशन कार्ड व आधार घेवून येणे आवश्यक आहे शिबीराचे स्थळ ग्रामिण रुग्णालय, माहुर ता. माहुर जि. नांदेड हे आहे. अधिक माहीतीसाठी आरोग्य मित्र श्री पुजारी मो. 9096620719 यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रेणुकाई हॉस्पिटल चे संचालक डॉ निलेश यांचे आई व वडिल यांनी ९० च्या दशकात माहूर परिसरात वैद्यकीय सेवा बजावली असून त्या सामाजिक बांधीलकीतून आणि जाणिवेतून डॉ निलेश यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिरासाठी माहूर हे ठिकाण निवडले आहे.