ग्रंथालयशास्त्रात एक दिवसीय आभासी राष्ट्रीय परिषद..NNL


नांदेड।
लोकमान्य महाविद्यालय सोनखेड, नांदेड व मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किल्ले धारूर जिल्हा बीड यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालय शास्त्रात "एक्सर्शन ऑफ आय.सी.टी टूल्स फोर इ-कन्टेन्ट डेव्हलपमेंट" या विषयावर एक दिवसीय आभासी पद्धतीने राष्ट्रीय परिषद दि. 27 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11:30 वाजता झूम ॲप द्वारे आयोजित करण्यात आली आहे.

या परिषदेचे उदघाटक म्हणून प्रो  डी. के. विर, संचालक,ज्ञान स्त्रोत केंद्र, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या हस्ते होणार आहे  तर की नोट स्पीकर म्हणून स्वा.रा. ती. म. विद्यापीठाचे ज्ञान स्त्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी असणार आहेत तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून टाटा शासकीय कॉलेज, संगारेड्डी हैदराबाद,तेलंगणा राज्यातील प्रा. विद्यासागर क्रोथा उपस्थित राहणार आहेत. 

या परिषदेचे मुख्य आयोजक म्हणून लोकमान्य महाविद्यालय, सोनखेड येथील प्राचार्य डॉ. हनुमंत आगलावे व कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किल्ले धारूर जिल्हा बीड  येथील प्र.प्राचार्य डॉ. दीपक भारती हे राहणार आहेत तर लोकमान्य महाविद्यालय सोनखेड नांदेड चे ग्रंथपाल डॉ. गोविंद घोगरे व कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किल्ले धारूर येथील ग्रंथपाल श्री गोपाल सागर हे संयोजक म्हणून असणार आहेत तसेच आयोजक सचिव म्हणून लोकमान्य महाविद्यालयतील आय. क्यू. ए ल.सी.समन्वयक डॉ. आशा धुमाळ व कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किल्ले धारूर येथील आय.क्यू.एसी समन्वयक डॉ डी.एन गंजेवार हे आयोजक सचिव म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तरी ग्रंथालय शास्त्रातील प्राध्यापकवृंद ग्रंथपाल,ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक व संशोधक विद्यार्थी यांनी ऑनलाइन राष्ट्रीय परिषदेला सदरील https://forms.gle/zYX4mLA45eZxonH37 लिंकवर जाऊन व जास्तीत जास्त संख्येने  नोंदणी करून उपस्थिती दर्शवावी असे आवाहन  लोकमान्य महाविद्यालयातील नॅक कॉर्डिनेटर प्रा.राजपालसिंह चिखलीकर यांनी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी