नांदेड। येथील डॉ. बी. आर. आंबेडकर फाउंडेशन तर्फे दिला जाणारा "समता गौरव" पुरस्कार नांदेड भूषण संत बाबा बलविंदरसिंघ जी लंगर साहिबवाले यांना प्रदान करण्यात आला.
नवा मोंढा मैदानावर सर्वपक्षीय भीम उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे,पुज्य भन्ते पय्याबोधी,शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर,माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा,महापालिका आयुक्त डॉ सुनिल लहाने, सहायक आयुक्त गिरीष कदम,कार्यक्रमाचे संयोजक बापूराव गजभारे- स्वागताध्यक्ष तथा नानक साई फाऊंडेशन चे प्रमुख पंढरीनाथ बोकारे, रमेशदादा सोनाळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, श्रीकांत दादा गायकवाड, जयदीप कवाडे, आकाश गजभारे, बालाजी ईबीतदार,प्रवीण साले, राकेश माही,पंजाबी गायिका गिन्नी माही यांची प्रमुख उपस्थिती होती.
लंगर साहिब गुरुद्वारा च्या माध्यमातून नांदेड मध्ये विविध सामाजिक आध्यत्मिक उपक्रम राबविण्यात संत बाबा नरेंद्रसिंघ आणि संत बाबा बलविंदरसिंघ हे यशस्वी झाले आहेत. कोणतीही नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास लंगर साहिब गुरुद्वारा सर्वांच्या मदतीला धावून येतो,कोरोना संकट काळात या संत मंडळींनी लाखो लोकांना मोफत अन्नदान केले.
अन्नदान सोबत च अनेक सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असतो. या महान कार्याची दखल घेत नांदेड येथील डॉ. बी. आर. आंबेडकर फाउंडेशन ने डॉ बाबासाहेब आंबेडकर "समता गौरव" पुरस्कार परम संत बाबा बलविंदरसिंघ जी लंगर साहिबवाले यांना प्रदान केला. या सन्मानाबद्दल संत बाबा बलविंदरसिंघ यांनी संयोजक बापूराव गजभारे आणि स्वागताध्यक्ष पंढरीनाथ बोकारे तसेच फाऊंडेशनचे धन्यवाद व्यक्त केले आहेत.