सकाळी ९ वा. पंचशील ध्वजारोहण डी.डी. भालेराव ( अभियंता नांदेड) यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमाच्या आध्यक्षस्थानी शिवाभाऊ नरंगले (. जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी) हे राहाणार असून, प्रमुख वक्ते म्हणून डॉ.गोविंद नांदेडे ( सेवानिवृत्त शिक्षण संचालक , पुणे ) डॉ.करूणाताई जमदाडे ( प्रसिध्द लेखिका ,मा.नगरसेविका ) प्रा.विजय भिसे , ( सहशिक्षक भिमाशंकर विद्यालय) श्याम पा.कपाळे (. मराठवाडा अध्यक्ष कृषी पदवीधर संघटना) आणि पाहुणे म्हणून मा.प्रविण पाटील चिखलीकर ( जि.प.सदस्य) बालाजी पांडागळे ( मा.सभापती प.स.कंधार) मा.माधवरदादा जमदाडे (. मराठवाडा अध्यक्ष रि. सेना ) मा.खुशालराव पा.पांडागळे ( मु.अ. भिमाशंकर विद्यालय तथा सरपंच शिराढोण ) मा.पांडुरंग पवार ( उपसरपंच) बालाजी रामराव पांडागळे ,आय.वाय.सावते, सेवानिवृत्त शिक्षक, भगवान कपाळे ( पोलीस पाटील) व्यंकटराव पांडागळे मालीपाटील , ॲड.बालासाहेब कपाळे , गणपतराव देवणे , साईनाथ पा.कपाळे , अंकुश वाघमारे , सोनकांबळे ( संचालक रयत कल्यण बॅंक ) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थितीत राहाणार आहेत. दुपारी तीन वाजता गावातून प्रमुख रस्त्याने भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचीत्राची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
रात्रीला महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक सुमेध एडके व संच शिवण ( जामगा ) व प्रसिद्ध गायिका सुनिता साळवे आणि संच गंगाखेड यांच्या भीमगिताचा दणदणीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी पंचक्रोशीतील भीमसैनिक अनुयायीनी व नागरिकांनी डॉ.आंबेडकर जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन भीमजयंती मंडळाचे बालाजी जमदाडे, मनोज जमदाडे, अनिल राक्षसे , समस्त गावकरी यांनी केले आहे.