महात्मा ज्योतिराव फुले जयंतीदिनी जिल्हा परिषदेत रक्तदान शिबिराचे आयोजन -NNL

मोठया संख्येने रक्तदान करण्याचे जयंती मंडळाच्यावतीचे आवाहन


नांदेड|
नांदेड जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी महात्मा ज्योतिराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती मंडळाच्या वतीने नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर -घूगे यांच्या संकल्पनेतून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दिनांक ११ एप्रिल २०२२ रोजी नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रांगणात सकाळी ११ वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

तरि इच्छूक रक्तदात्यांनी नाव नोंदवून रक्तदान कार्यक्रमात सहभाग नोंदवावा. मुख्यालयाबाहेरील, इतर तालुक्यातील जिल्हा परिषद अधिकारी,कर्मचारी, शिक्षक, ग्रामसेवक, सर्व कर्मचारी रक्तदान करण्यासाठी कार्यालय प्रमुखांना पूर्वकल्पना देवून रक्तदान करण्यासाठी थेट रक्तदान करण्यासाठी उपस्थित राहू शकतील. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घूगे यांच्या हस्ते रक्तदात्यांना विशेष प्रशस्तीपत्रक दिले जाणार आहे.  

अशी माहिती जयंती मंडळाचे अध्यक्ष अशोक कासराळीकर,  सचिव बालासाहेब लोणे, कार्याध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबिरे, कोषाध्यक्ष राजेश जोंधळे  व समस्त नांदेड जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी महात्मा ज्योतिराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर   संयुक्त जयंती मंडळ यांनी दिली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी