ग्रामीण पोलीस ठाण्याचे घोरबांड व सहकारी पोलीसांचा केला सन्मान
नांदेड| पोलिसांकडे नकारात्मक पाहायचा द्रष्टीकोण पाहायला मिळते. मात्र पोलीसांनी वसरणी भागातील केलेल्या शौर्याबद्दल दि. ११ एप्रिल रोजी गौरव केला. ज्यामुळे भविष्यात अधिक काम करण्यास मनोधैर्य वाढेल असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी केले.
सिडको नागरी सत्कार सोहळा समितीच्या वतीने दि. ११ एप्रिल रोजी सिडको छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोलीस निरीक्षक घोरबांड समवेत ईतर कर्मचारी बाधवांचा सायंकाळी ७ वाजता सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर पोलीस निरीक्षक घोरबांड, सहा. पोलीस निरीक्षक संकेत दिघे, पोलीस अंमलदार शिवाजी पाटील, प्रमोद कर्हाळे, प्रभाकर मलदोडे, संतोष जाधव, चंद्रकात स्वामी, विश्वनाथ पवार यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
गौरव सोहळ्याचे प्रास्ताविक भाजपा सिडको मंडळ अध्यक्ष वैजनाथ देशमुख यांनी केले. ज्यात पक्ष, संघटना विरहीत पोलीस बांधवांचे मनोधैर्य वाढेल जावे याकरिता सर्व समावेशक सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे देशमुख यांनी सांगितले. कार्यक्रमात विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी बांधवांनी पो. नि. घोरबांड व त्यांच्या सहकाऱ्यांचा पुष्पहार देऊन सत्कार केला.
सत्काराला उत्तर देताना घोरबांड म्हणाले की, ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा, सुव्यवस्था राखली जावी यासाठी स्थानिक विविध पक्षांचे पदाधिकारी यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे सांगितले. तर गुन्हेगारीचा बिमोड यावा यासाठी आपण सदैव तत्पर आहे. केवळ नागरीकांचे सहकार्य अपेक्षित आहे. बर्याचदा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा चुकीचा असतो, तसे न ठेवता खाकी तील माणूस म्हणून आमच्याकडे सदैव आम्ही सोबत आहोत आहोत असा विश्वास पो. नि. घोरबांड यांनी व्यक्त केला.
संचलन दिगंबर शिंदे तर आभार गिरीश डहाळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक वैजनाथ देशमुख, जनार्दन गुपीले, दिगंबर शिंदे, गिरीश डहाळे, भुजंग मोरे, प्रमोद रेवणवार, शिवानंद निल्लावार, डॉ. नरेश रायेवार, संजय पाटील घोगरे, धीरज स्वामी, पी. एस. गवळे, अतुल धानोरकर, संजय इंगेवाड, संजय श्रीरामे, सुदर्शन कांचनगीरे, अशोक मोरे, गजानन चव्हाण, माधव देवसरकर, दत्ता वरपडे, मंगेश कदम बालाजी पांगरेकर समवेत पो. नि. घोरबांड गौरव समिती सिडको यांनी परीश्रम घेतले.