तु.शं. कुलकर्णी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी यांच्यातर्फे लायन्सचा डबा -NNL


नांदेड|
ज्येष्ठ साहित्यिक स्वर्गीय तु.शं. कुलकर्णी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त रयत रुग्णालयात ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी यांच्यातर्फे लायन्सचा डबा निमा संजीव कुलकर्णी व संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.

रयत रूग्णालयात लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व लायन्स क्लब अन्नपुर्णा तर्फे सलग ११९५ व्या दिवशी म्हणजे दि.१० एप्रिल २०२२ रोजी लायन्सचा डबा देत असतांना रयत रुग्णालयाचे सहसचिव प्रा. डी. एस. बोराळकर, व्यवस्थापक बाबुराव पटवारी, आर्य चाणक्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष अभिजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. निमा व संजीव कुलकर्णी या उभयतांचा रयत रुग्णालयातर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . 

यावेळी बोराळकर यांनी प्रा.तु.शं.कुलकर्णी यांच्या आठवणी आपल्या प्रास्ताविकातून विशद केल्या. तु.शं. कुलकर्णी यांच्या साहित्यातून आपणाला प्रेरणा मिळाल्याचे प्रतिपादन लायन्स क्लब नांदेड सेंट्रलचे अध्यक्ष दिलीप ठाकूर यांनी केले. गेल्या चार वर्षापासून रयत व श्रीगुरुजी रूग्णालयात डबा वितरित करण्यात येतो. लोकसहभागातून दिलीप ठाकूर यांच्या पुढाकाराने बारा वर्षात पाच लाखापेक्षा जास्त रुग्णांना जेवणाचे डबे देण्यात आलेले आहेत. 

हे डबे देण्यासाठी प्रोजेक्ट चेअरमन राजेशसिंग ठाकूर, प्रभुदास वाडेकर, लायन्स सेंट्रल सचिव अरुणकुमार काबरा, कोषाध्यक्ष सुरेश निल्लावार, लायन्स अन्नपूर्णा चे नागेश शेट्टी,सचिव धनराजसिंह ठाकूर, कोषाध्यक्ष अनिल चिद्रावार,विजय वाडेकर हे परिश्रम घेत असतात. रविवारी डबे वितरणप्रसंगी गिरीश पटवारी, डॉ.  वैभव पुरंदरे, प्रियदर्शनी किर्तने, रवी पुट्टा, रंजना सोनकांबळे हे उपस्थित होते. लायन्सच्या डब्याची वितरण व्यवस्था पाहून संजीव कुलकर्णी यांनी दरवर्षी दहा एप्रिल ला वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ अन्नदान करण्याचा  मानस व्यक्त केला. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी