अर्धापूर| तालुक्यातील मालेगाव येथील मंगलकार्यालयात १४ एप्रिलला होणाऱ्या मराठा वधू-वर परिचय मेळाव्याला मराठा समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचे आवाहन समीतीने केले आहे.
मराठा समाज सर्व क्षेत्रात प्रगतीवर आहे,पण इतर समाजासारखे वधू-वर परिचय मेळाव्यातून लग्न झाल्यास मराठा समाजाची अधीक प्रगती होईल या उद्देशाने १४ एप्रिलला मालेगाव येथील लक्ष्मीनृसिंह मंगलकार्यालयात मराठा समाजाच्या समीतीने वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे, यावेळी भगतसींग विद्यार्थी परीक्षेचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजी.शिवाजीराव पाटील बाभळीकर, साहित्यिक डॉ.हनुमंत भोपाळे, लाल बहादूर विद्यालयाचे प्राचार्य गोपाळराव कदम,यांच्यासह परीसरातील पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे.
यावेळी वधू-वर घ्या पालकांनी दोन परीचय पण व फोटो सोबत आणावेत, यावेळी बायोडाटा पाठवून वधू-वर यांना उपस्थित राहवे लागेल,पहिल्या सत्रात परिचय व नंतर पसंती जोडप्यांनी चर्चा व भेटी असा कार्यक्रम आयोजित केला आहे, मराठा वधू-वर परिचय मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीने केले आहे.