लोह्यात जय श्रीराम घोषणांनी शहर दुमदुमले -NNL


लोहा|
विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम नवमी निमित्त लोहा शहरात भव्य शोभायात्रा व मोटारसायकल रॅली काढण्यात आली. भगव्या पताका लावून  तरुण, व्यापारी मोठ्या संख्येने मोटारसायकली रॅलीत सहभागी झाले होते. जय श्रीराम या  घोषणांनी शहर दुमदुमले.

श्रीराम नवमी निमित्त शहरातील हिंदू बांधवांनी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने लोहा शहरात भव्य मोटारसायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या मुख्य चौकातील  राजाराम नगरातील हनुमान मंदिर येथून रॅली स सुरुवात करण्यात आली. रॅलीचे प्रतिनिधित्व पेनूर येथील पंचायती आखाडा बडा उदासीन निर्वाण पीठ सद्गुरू उदासीन मठ तीर्थक्षेत्र परत गंगा उदासीन मठाचे महंत चंडीदास मुनी उदासीन यांनी केले.

प्रारंभी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सदरील रॅली ही बसस्थानक मार्गे भाजी मंडई, विठ्ठलवाडी, जुना लोहा येथील शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून मारोती मंदिर, बाजार कमान, मोंढा  मार्गे शिक्षक कॉलनी येथील श्रीराम मंदिर येथे विसर्जित करण्यात आली. मिरवणुकीत जय श्रीराम घोषणांनी लोहा शहर दुमदुमले होते. प्रभू रामचंद्र यांच्या प्रतीमेस माजी उपनगराध्यक्ष केशवराव चव्हाण - मुकदम, नगरसेवक भास्कर पवार, दत्ता वाले, हरिभाऊ चव्हाण, आर्य  वैश्य संघटनेचे दिनेश तेललवार, प्रतिष्ठित व्यापारी लक्ष्मीकांता बिडवई,बाळू सावकार पालिमकर सुधाकर पाटील पवार, व यांनी बसस्थानक परिसरात पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

रॅलीचे नेतृत्व विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे शहर प्रमुख अंबादास पाटिल पवार, गणेश पाटिल कल्याणकर, गजानन पाटिल चव्हाण, शिवराज पाटिल मूंडकर, कांता बिडवई,  युवा  कार्यकर्ते सचिन चव्हाण - मुकदम यांनी केले. यावेळी राजू कदम, अमोल मोटरवार, अभिवक्त संघाचे अध्यक्ष ऍड अरविंद मोटरवार, युवा कार्यकर्ते  दीपक कानवटे, गिरीश दमकोंडवार, माजी नगरसेवक  युवराज वाघमारे, बालाजी पाटील कळकेकर, हनुमंत पाटील मस्किकर, गोविंद फाजगे, भुताळे, संकेत मोतेवार आदींसह बजरंग दलाच्या तरुण कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. आत्माराम महाराज रायवाडीकर त्यांच्या कीर्तन नंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. रॅलीत बहुसंख्येने बजरंगी सहभागी झाले होते.

श्रीराम नगरात महाप्रसाद - शहरातील श्रीराम नगरातील प्रभू रामचंद्र मंदिरात सकाळी महाआरती, अभिषेक, कीर्तन, भजन आदी कार्यक्रम घेण्यात आले. त्यानंतर दुपारी मंदिर संस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास हजेरी लावली होती. विजय चनावार,  गजानन उप्पर वाड, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, काशिनाथ भोसीकर, शुभम सावकार आदींनी यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी