नांदेड| कंधार तालुक्यातील बोरी बुद्रुक येथे श्री महादेवाची यात्रा आणि कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली असून दिनांक 13 ते 15 एप्रिल दरम्यान ही यात्रा आणि कुस्त्यांची दंगल रंगणार आहे. यात्रा आणि कुस्त्यांच्या दंगलित मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री महादेव मंदिर ट्रस्ट बोरी बुद्रुक चे अध्यक्ष तथा खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह संयोजकांनी केले आहे.
दोन वर्षांच्या खंडानंतर पहिल्यांदाच बोरी बुद्रुक येथे श्री महादेवाची यात्रा आणि कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे . दिनांक 13 एप्रिल रोजी रात्री आठ वाजता श्री महादेवाचे लग्न लागेल. त्यानंतर दिनांक 14 एप्रिल रोजी गुरुवारी अंबाली बारस निमित्त काठी कावडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रात्री नऊ वाजता दारूगोळा उडविणे आणि त्यानंतर रात्री साडेअकरा वाजता संगीत माहेरची पुण्याई या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 15 एप्रिल रोजी दुपारी एक वाजल्यापासून कुस्त्यांचा जंगी सामना पार पडणार असून पहिले बक्षीस 51 हजार रुपये आणि चांदीची गदा ठेवण्यात आली आहे .या महादेवाची यात्रा आणि कुस्त्यांच्या दंगलीत भाविक भक्त आणि पहिलवानानी सहभागी व्हावे असे आवाहन श्री महादेव मंदिर ट्रस्ट बोरी बुद्रुक चे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार डॉक्टर तुषार राठोड , मंदिर ट्रस्ट सचिव बालाजिराव झुंबाड यांच्यासह कागणेवाडी, नावांद्याचीवाडी, कळका, कळकावाडी, टोकवाडी, वाखरड, वाखरड वाडी आणि पिंपळाची वाडी येथील समस्त ग्रामस्थांनी केले आहे.