नांदेड| दिपकनगर येथील श्रीनिकेतन प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका तथा संस्थेच्या सहसचिव डॉ.सौ.एस. एन.राऊत यांच्या अध्यक्षतेखाली स्त्री शिक्षणाचे जनक,थोर समाज सुधारक,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमात सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील अज्ञान, दारिद्र्य,जातिभेद दूर करण्यासाठी स्त्री शिक्षणावर भर देऊन पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू करून शिक्षिकेची जबाबदारी त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपवले व तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांनाही त्यांनी न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहिले, महात्मा फुले यांनी केलेले कार्य अविस्मरणीय असून ते सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापिका डॉ.सौ.राऊत यांनी केल्या.
कार्यक्रमात शिक्षक प्रल्हाद आयनेले,श्रीधर पवार यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी अविनाश इंगोले, बाळकृष्ण राठोड, सुदर्शन कल्याणकर, मगरे, सौ.सुरेखा मरशिवणे, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर शाळेच्या प्रांगणात महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्याध्यापिका डॉ.सौ. राऊत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्र संचलन आयनेले यांनी तर उपस्थितांचे आभार कल्याणकर यांनी मानले.