वीज कंपनीतील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या ज्वलंत प्रश्नावर लढा उभारणार -NNL

माविकसंच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत निर्णय


नांदेड|
वीज कंपनीतील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे शासन दुर्लक्ष करीत असून या संदर्भात मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या समितीची बैठक व संयुक्त सभा पहिल्यांदाच नांदेड येथील हॉटेल गणराज येथे संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय घोडके हे होते. सदरील बैठकीत अधिकारी व कर्मचार्‍यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. प्रलंबित प्रश्नाबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. 

शासनाने कर्मचार्‍यांचे प्रश्न गांभिर्याने घेवून सोडविले पाहिजे अन्यथा संघटनेच्यावतीने आंदोलन छेडले जाईल. संघटनेच्या संघटन बांधणीबाबत चर्चा करुन आढावा घेण्यात आला. बहुजन विद्युत अभियंता कर्मचारी फोरम संघटनेचे नेते राजकुमार सिंदगीकर यांच्यासह 62 सदस्यांनी माविकसंमध्ये प्रवेश केला आहे. 

प्रवेश करणार्‍या सर्व पदाधिकार्‍यांचे व सदस्यांचे स्वागत करण्यात आले. संघटनेचे मुख्य सल्लागार जे.एस.पाटील व प्रदेशाध्यक्ष संजय घोडके यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला केंद्रीय जनरल सेके्रटरी प्रेमानंद मोर्य, कायदेविषयक सल्लागार नरेंद्र दारोंडे, केंद्रीय कार्याध्यक्ष एस.के.हनवते,  केंद्रीय संघटक वाय.के.कांबळे, केंद्रीय उपाध्यक्ष सिध्दार्थ पाटील, उपसरचिटणीस संजय मोरे, दिनेश कांबळे यांच्यासह राज्यातील पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी