तालूका पातळीवरील बैठकांवर भर; 20 हजार जनसमूदाय उपस्थित राहणार
नांदेड| जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या नांदेड येथील अश्वारुढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा दि. 22 रोजी श्री केदार जगद्गुरु व पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. या सोहळ्यासाठी प्रत्येक तालूक्यात बैठका घेण्यात येत असुन 20 हजाराहून अधिक बसव भक्त उपस्थित राहणार आहेत.
स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय बेळगे, काँग्रेसचे कंधार तालूका अध्यक्ष बालाजीराव पांडागळे, जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी बैठकांचा झपाटा सुरु केला आहे. आतापर्यंत अर्धापुर, बारड, मुदखेड, मुखेड, देगलूर, लोहा, कंधार याठिकाणी जावून त्या भागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून लोकार्पण सोहळा यशस्वी करण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.
मुखेड येथील बैठकीच्या अध्यक्षस्थानी जि.प. माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर हे होते. तर यावेळी माजी जि.प. सदस्य बालाजी बंडे, दशरथ लोहबंदे, काँग्रेस जिल्हा प्रवक्ते दिलीप कोटगिरे, शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार, युवक काँग्रेस अध्यक्ष संतोष बोंणलेवार, माजी उपसभापती शिवलिंग पाटील कामजळगेकर, रामराव पाटील, येवतीचे माजी सरपंच विजय पाटील, जि.प.चे माजी सदस्य जिवन दरेगावे, नंदगावचे माजी सरपंच हौवगीराव पाटील, सुभाष तांबोळी, अरुण पत्रे, शिवकुमार गंदीगुडे, बेळीचे सुनिल आरगिळे, विद्याधर साखरे, बालाजी बोमनाळे, सुनिल तरगुडे, मारोती पाटील, हंगरगा येथील राजीव पाटील, भीमराव पाटील, बालाजी वारे, (हिप्परगा) सलगरा सरपंच कापसे, मुखेडचे पत्रकार शिवकांत मठपती, काँग्रेस प्रवक्ते दिलीप कोडगिरे, मजुर फेडरेशनचे संचालक शौकत पठाण, माजी नगराध्यक्ष गणपतराव गायकवाड, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार मडगुलवार, युवक काँग्रेसचे संतोष बोनलेवाड, मजुर फेडरेशनचे माजी चेअरमन हेमंत घाटे, माजी नगरसेवक हनमंत नारनाळीकर, बेळीचे सरपंच नागनाथ पाटील जून्ने, विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल गायकवाड, सरचिटणीस रामेश्वर पाटील इंगोले, माजी उपसरपंच सुरेश पाटील बेळीकर, बालाजी साबणे, बालाजी वाडेकर यांच्यासह शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी आणि लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कंधार येथील बैठकीचे आयोजन तालूकाध्यक्ष बालाजी पांडागळे यांनी केले होते. या बैठकीस माजी नगराध्यक्ष रामराव पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवदास धर्मापुरीकर, ॲड. बाबूराव पुलकुंडवार, माजी उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, नगरसेवक शहाजी नळगे यांची उपस्थिती होती. अर्धापूर येथे झालेल्या बैठकीस जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, तालुका अध्यक्ष बालाजी गव्हाणे, शहराध्यक्ष राजू शेट्टे, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे यांची उपस्थिती होती. नायगाव येथे झालेल्या बैठकीस श्रीनिवास चव्हाण, बंडू चव्हाण यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
देगलूर येथे माधवराव मिसाळे, शिवाजीराव देशमुख बळेगावकर, प्रितम देशमुख, दीपक शहाणे, प्रशांत पाटील, बस्वराज पाटील बन्नाळीकर, ताराकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बिलोली येथील बैठकीस माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, ॲड. कुऱ्हे, जनार्दन बिराजदार यांची उपस्थिती होती. याच पद्धतीने लोहा येथे कल्याण सावकार सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली तर बारड येथे सुनील देशमुख, निलेश देशमुख, किशोर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत लिंगायत समाजाची कोरे यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. मुदखेड येथे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उद्धव पवार यांनी बैठकीचे आयोजन केले होते. या सर्व बैठकांमधून किशोर स्वामी, संजय बेळगे, बालाजी पांडागळे व संतोष पांडागळे यांनी हजारोच्या संख्येने पुतळा लोकार्पणासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.