नांदेड| महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा नांदेड शहरात व्हावा यासाठी तत्कालीन पुतळा कृती समितीचे अध्यक्ष कै.प्रकाश भाऊ कौडगे यांच्या सह हजारो लिंगायत बांधवांचे रक्त सांडले आहे परंतू आज पुतळा उद्घाटन कार्यक्रम मात्र काँग्रेस पक्ष प्रायव्हेट लिमिटेड करत असल्याचा आरोप पुतळा कृती समितीचे सदस्य तसेच पुतळ्यासाठी 2013 मध्ये 6 दिवस अन्नत्याग उपोषण केलेले शुभाशिष कामेवार यांनी केला आहे.
महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा पूर्णत्वास गेला आहे याचा मनस्वि आनंद आहे परंतू याच काँग्रेस चा पुढाऱ्यांनी तत्कालीन पुतळा कृती समितीचे नेते कै. प्रकाश कौडगे यांच्या नेतृत्वाखाली महापालीकेवर काढलेल्या मोर्चावर पोलिसाना अमानुष लाठीमार करायला लावला हजारो समाज बांधवांचे रक्त सांडले, जाणीवपूर्वक प्रकाशभाऊ च्या चालकाला मारहाण केली, प्रकाश भाऊ सह आम्हा अनेकांना अटक केली.
आमच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले.आजही आम्ही न्यायालयीन लढा लढत आहोत आणी आज तीच कॉंग्रेस चार स्वयंघोषित काँग्रेस मधील लिंगायत लोकाना आणी समाजाच्या नावावर सेटलमेंट करून संघटना चालवनार्यांना घेऊन पुतळा अनावरण कार्यक्रम स्वतः पुराता लिमिटेड करून लिंगायतांची दिशाभूल करत आहे. आज प्रकाश भाऊ कौडगे हयात नाहीत परंतू त्यांच्या वारसाला सन्मामाने कार्यक्रमाला आमंत्रित करावे. आणी पुतळ्याचे राजकिय भांडवल करू नये कारण पुतळा हजारो समाज बांधवांच्या रक्ता च्या अभिषेकाने माखला आहे. असे सुभाशिष कामेवार यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.