नवीन नांदेड| पळशी ता़.लोहा येथे दी.९ एप्रिल ते १६ एप्रिल दरम्यान अखंड हरीनाम सप्ताह व भागवत कथेला प्रारंभ झाला आहे़. भागवताचार्य हरीभक्त पारायण, अकाश महाराज खोकले, गंगाखेडकर यांच्या अमृतवाणीतून दररोज दुपारी १ ते ४ या वेळात भागवतकथा सांगण्यात येत आहे़.
या कथेस संगीत संच शाहीर सुधीर पळशीकर, वादक गोविंद महाराज धोतरेकर, गायक पांडूरंग शिंपले यांची साथ मिळत असुन दररोज या संगीत मय कथेला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत़. दररोज रात्री ९ ते ११ हरीकिर्तन आयोजित करण्यात आले असून ११ एप्रिल रोजी पंढरी महाराज मिरकुटे यांचे हरीकिर्तन होईल तर १२ रोजी दिलीप महाराज मोळवणकर, १३ रोजी व्यंकट महाराज दगडवारीकर, १४ परमेश्वर महाराज शहरापुरकर, १५ रोजी ज्ञानोबा माऊली मुडेकर, १६ अर्जुन महाराज शास्त्री यांचे हरीकिर्तन होणार असून दररोज गावकरी व दानशूर भक्ताच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे़.
हरीभक्त पारायण साहेबराव महराज पळशीकर यांचे गुलालाचे किर्तन रामनवमीच्या दिवशी रविवार सकाळी झाले आहे .या वेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात मृदगाचार्य संगीत विशादक माऊली महाराज दगडगांवकर,विशाल शिंदे,राम शिंदे,ज्ञानेश्वर संतवाणी, वैजनाथ पावडे, यांच्या सह इतर गायकांची साथ मिळत आहे सप्ताह दरम्यान अन्नदान करण्यासाठी तुळशीराम कोल्हे,भरत कोल्हे, निवृत्त शिंदे, भिमराव वरळे,हरीचंद्र श्रीमंगले , आचुत वानखेडे यांच्या सह गावकऱ्यांनी सहकार्य केले आहे.
१६ एप्रिल रोजी हनुमान जयंती चर्या दिवशी कार्यक्रमाची सांगता होणार असुन हरीभक्त पारायण अर्जुन महाराज शास्त्री यांचे किर्तन सकाळी ११ ते १ या दरम्यान होणार असून त्यानंतर महाप्रसाद होईल कार्यक्रमाचा लाभ परिसरातील भाविकांनी घ्यावा असे आवाहन शाहीर सदाशिव कोल्हे, सुधीर कोल्हे पळशीकर व गावकरी मंडळी यांच्या वतीने करण्यात आले आहे़.