नांदेड| सावता परिषद, अखिल भारतीय माळी महासंघ व समता परिषद यांच्या संयुक्तीकरित्या दि. ११ एप्रिल २०२२ सोमवार रोजी सकाळी ठिक १० वाजता सावित्रीबाई जोतीराव फुले पूर्णाकृती पुतळा आयटीआय चौक, नांदेड येथे भारताचे पहिले शिक्षक, बहुजनांचे उद्धारक, क्रांतीसूर्य शिक्षण सम्राट महात्मा जोतीराव फुले यांची १९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. गोरखनाथ राऊत, जेष्ठ समाजसेवक रामचंद्र सावंत, माजी सभापती लक्ष्मणराव जाधव, समता परिषदेचे सखाराम शितळे, सौ. भगीरथाबाई शितळे, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, रामचंद्र रासे (अण्णा), जिल्हाध्यक्ष माधव धोतरे, प्रा. लक्ष्मणराव शिंदे (नाना), महानगराध्यक्ष बालाजी वानखेडे, जिल्हा प्रवक्ता मारोती शितळे, महानगर कार्याध्यक्ष संदिप झांबरे, जिल्हा युवा अध्यक्ष सुनील शिंदे, सोशल मिडिया प्रमुख ज्ञानेश्वर गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गोरखनाथ राऊत यांच्या हस्ते महात्मा जोतीराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड यांनी आपले विचार मांडले. ते आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की, महात्मा जोतीबाराव फुले यांनी शिक्षणामध्ये खूप मोठी क्रांती केली असून आपण सर्वांनीच त्यांच्या कार्याचा व विचारांचा आदर्श घेऊन कार्य करण्याची काळाची गरज आहे. व फुले दाम्पत्याला भारत सरकारने मरणोपरांत भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करावा अशीही मागणी यावेळी गुणवंत एच. मिसलवाड यांनी आपल्या भाषणात केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बजरंग रासे, आनंद जाधव, केम रासे, लक्ष्मण झांबरे, रामप्रसाद रासे, सचिन पंचनुरे, एकनाथ पाच्छे, सत्यपाल नरवाडे, प्रविण जेटीथोर यांनी सहकार्य केले.