नांदेड| राज्य गुणवंत कामगार असोसिएशन संघटना नांदेड जिल्ह्याच्यावतीने दि. ११ एप्रिल २०२२ सोमवार रोजी सकाळी ठिक ९ वाजता सावित्रीबाई जोतीराव फुले पूर्णाकृती पुतळा आयटीआय चौक, नांदेड येथे थोर समाजसुधारक, क्रांतीसूर्य, सत्यशोधक, शिक्षणसम्राट महात्मा जोतीराव फुले यांची १९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी राज्य गुणवंत कामगार असोसिएशन संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष रत्नाकर शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष गुणवंत एच. मिसलवाड, जिल्हा सचिव पंडीत तेलंग यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्वप्रथम जिल्हाध्यक्ष रत्नाकर शिंदे यांच्या हस्ते महात्मा जोतीराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी असोसिएशनचे सदस्य रमेश नारलावार, राजकुमार शिंदगीकर, रामदास पेंडकर, आनंदा गंगातीर, राम ठाकूर, भाई प्रकाश वागरे, लक्ष्मण देशमुख, होणाजी कपाटे, शकुंतला कदम, शिलाताई नाईकवाडे, शकुंतला खंदारे, संजय मोरे, बळीराम उबाळे, श्रीराम गालेवाड हे उपस्थित होते.