नांदेड| शहरात सध्या डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. प्रभागात औषध फवारणी होते की नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला असून, डासांचा उपद्रवाचा नागरिकांना सहन करावा लागत आहे.
डासांच्या प्रादुर्भावामुळे आजार पसरण्याची भीती असून, पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने यात लक्ष घालून औषध फवारणी व उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. डासांचा उपद्रव कमी करण्यासाठी महिन्यातील काही दिवस औषध फवारणी तसेच गटारात द्रवरूप औषधे वापरून सर्व घरे, सोसायट्यांजवळील आवारात त्यांचा वापर केला जात होता.
परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून यापैकी कोणतीही उपाय योजना केल्याचे दिसून येत नाही. परिणामकारक औषध फवारणी होत नसल्याने व त्यावर स्वच्छता निरीक्षकांचे कोणतेही नियंत्रण असल्याने डासांचे निर्मूलन होत नाही. ही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खेदाची बाब असून पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यायला हवी, अशी मागणी होत आहे.
शहरातील काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना जनतेच्या आरोग्याची कोणतीही पर्वा नाही. अशोक चव्हाण साहेबांच्या पुण्याईवर नगरसेवक झालेल्या निष्काळजी नगरसेवकांना येणाऱ्या निवडणुकीत फटका बसणार असल्याची प्रतिक्रिया मनसेचे उपाध्यक्ष अजित पाठक यांनी दिली आहे.