मस्जिद,मंदिर,चर्च,विहारात भोंगे लावण्याची परवानगी पोलीस स्टेशन मधून घ्यावी संध्याकाळी १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक बंद
अर्धापूर, निळकंठ मदने| तालुक्यातील मस्जिद,मंदिर,विहार,चर्च वर विनापरवाना ध्वनिक्षेपक लावल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असुन, ध्वनिक्षेपक नियमन व नियंत्रण या नियमाच्या अनुषंगाने अंमलबजावणीच्या दृष्टीने हालचाली पोलीस प्रशासनाने सुरू केल्या आहेत. सर्वधर्मीय प्रार्थनास्थळ येणार असुन धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेपकांच्या आवाज मर्यादेपेक्षा जास्त असल्यास ५ वर्ष कैद व १ लाख रुपये दंड होणार असल्याने धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेपकांची परवानगी काढून शासनाचे नियम पाळावेत अशी माहिती बैठकीस मार्गदर्शन करतांना उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील उपस्थितांना दिली आहे.
राज्यात भोंग्यांवरून राजकारण सुरू आहे.मशदीतून अजान, तर मंदिरांमध्ये किर्तन व आरत्या, प्रवचने आदी कार्यक्रम होतात. या सर्वांना आता ध्वनिप्रदूषण कायद्या अंतर्गत आपला आवाज मर्यादित ठेवावा लागणार आहे.सध्या तालुक्यातील धार्मिक स्थळांवर ध्वनिक्षेपक असून, त्यापैकी एकानेही परवानगी घेतलेली नाही की, ती नसल्याने कुणावर कार्यवाहीदेखील झालेली नाही, हे विशेष. मात्र, भोंगे प्रकरणावरून सर्वच प्रकारच्या ध्वनिप्रदूषणाने त्रस्त रहिवाशांना तेवढा दिलासा येत्या काळात मिळू शकतो.
अर्धापूर पोलिस प्रशासनाने असलेल्या एका ध्वनिमापक यंत्राद्वारे धार्मिकस्थळांवरील भोंग्यांच्या आवाजाची मर्यादा पेक्षा जास्त आवाज केल्यास तपासणी होणार आहे.जास्त डेसिबल असल्यास गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी दिली आहे. अर्धापूर पोलिसांनी शनिवारी ध्वनिमापक यंत्रांचे प्रात्यक्षिक घेऊन आवाजाच्या मर्यादेची नोंद केली. येत्या दिवसांत शहरभरातील धार्मिक स्थळांच्या आवाजाची मोहीम राबविली जाईल. त्यातून मर्यादपेक्षा अधिक तीव्रतेने आवाज करणाऱ्या (प्रदूषण) भोंग्यांबाबत संबंधितांना कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागेल.
६ ते १० वेळात आवाज मर्यादा - ध्वनिक्षेपक वापराबाबत ध्वनिप्रदूषण नियमन व नियंत्रण नियम २००० लागू आहे. त्या अंतर्गत विनापरवानगी ध्वनिक्षेपक अथवा साउंड सिस्टीम लावता येत नाही. सार्वजनिक ठिकाणी नेहमीच्या आवाजापेक्षा ७५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज करू शकत नाही. क्षेत्रनिहायदेखील नियम आहेत. त्यात औद्योगिक परिसरात दिवसा ७५ आणि ७० डेसिबल, व्यावसायिक क्षेत्रात दिवसा ६५ आणि रात्री ५५, रहिवासी परिसरात दिवसा ५५ आणि रात्री ४५, शांतता क्षेत्रात दिवसा ५० आणि रात्री ४० डेसिबल अशी मर्यादा घालून देण्यात आली आहे.
यावेळी नगरसेवक सोनाजी सरोदे,मृत्यूंजय दूत गोविंद टेकाळे, पत्रकार सखाराम क्षीरसागर,उध्दव सरोदे,संदीप राऊत आदी सह अनेकजण उपस्थितीत होते. हि बैठक यशस्वी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक बळीराम राठोड, पोउनि म.तयब्ब सपोउपनि कैलास पवार, जमादार राजेश वरणे,डिएसबीचे भिमराव राठोड,महेंद्र डांगे,सप्निल रूंजकर,राजेश कांबळे,संदीप आनेबोईनवाड,गुरूदास आरेवार, राजेश घुन्नर आदींनी परिश्रम घेतले.या बैठकीत मंदिराचे अध्यक्ष व पुजारी तसेच मौलाना उपस्थितीत होते