अर्धापुर, निळकंठ मदने| तालुक्यातील निमगाव येथे आदिवासी कोळी महादेव समाजाचा २४ वा सामूहिक विवाह सोहळा आज २४ एप्रिल रोजी दुपारी संपन्न झाला आहे. या सामूहिक विवाह सोहळ्यात ११ जोडपी विवाह बंधनात बांधले गेले आहेत.
पुर्वीच्या हदगाव व आताच्या अर्धापुर तालुक्यातील निमगाव येथे २४ व्या आदिवासी कोळी महादेव समाजाच्या सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे,२४ एप्रिल रोज रविवारी दुपारी १२:३१ ला होणाऱ्या सामुहिक विवाह सोहळ्यात एकूण ११ जोडपी विवाह बंधनात बांधले आहेत. २४ वर्षाची परंपरा कायम ठेवून याही वर्षी मोठया उत्साहात हा सामूहिक विवाह सोहळा वेळेवर आज संपन्न झाला आहे, या विवाह सोहळ्यास गेल्या एका महिन्यापासून समाज बांधव व ग्रामस्थ भाग घेऊन मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, यामुळे सामूहिक विवाह मेळावा यशस्वी होती आहे,यावेळी ७ हजारावर जणसमुदाय जमा होता, सर्व क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थित होती, लग्नानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी ग्रामसेवक संघटनेचे गीरधारी मोळके, सरपंच संजय मोळके, पोलिस पाटील कान्होजी मोळके,डि एम मोळके,कृऊबा संचालक कल्याण मोळके,अनिल मोळके,जी पी सुर्यवंशी, उपसरपंच वसंत चव्हाण,गणपत सोळंके,बंटी राठोड,दगडोजी जगताप, बालाजी जगताप, गंगाराम झुडपे, गोरखनाथ सोळंके, अंकुश मोळके,सुरेश घोरपडे,रमेश घोरपडे,नालाजी तेली,नालाजी मोळके,संजय घोरपडे, साहेबराव झुडपे,गजानन सुर्यवंशी,पांडूरंग झुडपे,, नागोराव गोमाशे, शिवाजी सोळंके, राधेश्याम पारीख, गोपीनाथ वडजेव, नरेंद्र मोळके, विनायक मोळके, नानासाहेब घोरपडे व आदिवासी कोळी महादेव समाज व ग्रामस्थांनी हा मेळावा यशस्वी करण्यासाठी केले आहे.