गोर सेनेचा क्रांतिकारी मोर्चा मुंबईत धडकणार -NNL


हिमायतनगर।
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास ७५ वर्षे झाली तरीही या देशाचे मूलनिवासी असूनही अद्याप आम्हाला आमचा हिस्सा , मानसन्मान , हक्क , अधिकार बरोबर देण्यात आलेला नाही. यासह असंख्य मागण्यांसह गोर सेनेच्या वतीने ११ मे बुधवार रोजी गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश भाऊ चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई येथील आझाद मैदानावर क्रांतिकारी विराट मोर्चा हजारो जनसमुदाया समोर धडकणार आहे. 

या क्रांतिकारी विराट मोर्चाला नांदेड जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गोर सेनेचे नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जगदीश जाधव यांच्या वतीने करण्यात आले आहे . मागील कित्येक वर्षापासून या महाराष्ट्र मधील तमाम पीडित , शोषित , वंचित घटकांना न्याय मिळाला नसल्याने वारंवार सर्वसामान्यांवर अन्याय झाला आहे . शिवाय जातीनिहाय जनगणना , स्थानिक निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण अबाधित रहावे , नॉनक्रिमलेयर अट रद्द करणे , सारथी व बार्टी धर्तीवर ओबीसी व व्ही.जे.एन.टी विद्यार्थीना सवलती देणे , जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे अधिकार जिल्हा पातळीवर नं ठेवता विभागीय पातळीवर ठेवावे.

जिल्हा पातळीवर फक्त अर्ज घेण्यात यावे यांसह आधी मागण्या घेऊन गोर सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा.संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश चव्हाण यांचे आदेशानुसार क्रातींकारी विराट मोर्चा आझाद मैदानावर धडकणार असल्याने तमाम महाराष्ट्रातील ओबीसी बांधव तसेच माजी , आजी खासदार आमदार , जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य , विविध संगटनेचे पदाधिकारी आदींनी येत्या ११ मे ला मुंबई येथे उपस्थित राहण्याचे आवाहन जगदीश जाधव (गोर सेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नांदेड) यांनी प्रसार माध्यमांना बोलतांना सांगीतले आहे .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी