पाणी द्या नाहीतर खुर्च्या खाली करा मोर्चेकऱ्यांनी केली मागणी; पदाधिकार्यांची उडाली तारांबळ
अर्धापूर। तालुक्यातील स्मार्ट व्हिलेज लहान येथे मुबलक पाणी साठा असूनही ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष व नियोजन नसल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. वारंवार सांगूनही पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी त्रस्त झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढला व पाणी द्या नाहीतर खुर्च्या खाली करा अशी मोर्चेकऱ्यांनी मागणी केली.
यावेळी महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मोर्चात सुभाष लोणे,प्रकाश पाटील इंगळे, विश्वंभर दळवे,दिगंबर वाहेवळ, बाळासाहेब मोरे, प्रवीण लोणे, प्रकाश सोळंके, बाबुराव देवडे, हनुमंत बद्दलवाड, संजय जोगदंड प्रवीण चव्हाण, भूपेंद्र मोरे, शशिकलाबाई बनसोडे, लक्ष्मीबाई बनसोडे, गयाबाई सोळंके, श्रीमती काळेबाई, कोंडाबाई साखरे, कांताबाई साबळे, आदी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मोर्चेकऱ्यांनी ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढला व नागरिकांना तात्काळ पिण्याचे पाण्याची व्यवस्था करावी मागणी केली पदाधिकाऱ्यांनी मोर्चेकर्यांना पाणी देण्याचा अश्वासन दिल्याने मोर्चा विसर्जित करण्यात आला.
तालुक्यातील मोठी असलेली ग्रामपंचायत स्मार्ट विलेज लहान हे मागच्या काही दिवसापासून अनेक कामात वादग्रस्त ठरली आहे गावात शासकीय कामात गैरव्यवहार करून आपले उखळ पांढरे करण्याचे प्रकार झाले आहेत सध्या गावामध्ये नरेगा ची ची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून सदर कामे अतिशय निकृष्ट दर्जाचे केली जात आहे करोडो रुपयांचा विकास निधी ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला आहे मात्र सदरील कामे अतिशय निकृष्ट दर्जाचे करून आपले उखळ पांढरे करून घेण्याचा प्रकार पदाधिकाऱ्यांनी चालवला आहे त्यामुळे ागरिकांचे प्रश्न ऐरणीवर आले असून पाणी टंचाईचा तिव्र प्रश्न असताना पदाधिकारी या प्रश्नाकडे लक्ष देताना दिसून येत नाही वारंवार सांगूनही त्रस्त झालेल्या नागरिकांनी दे धडक मोर्चा काढून पदाधिकाऱ्यांना सुनावले यामुळे पदाधिकारी यांची तारांबळ उडाली होती.