नांदेड| प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त "रस्ता सरुक्षा मार्गदर्शन" शिबीराचे आयोजन 31 मार्च रोजी करण्यात आले. या शिबीरास अध्यक्षस्थानी मनपा स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी व प्रमुख अतिथी म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत हे उपस्थित होते.
सभापती किशोर स्वामी यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सुरु केलेल्या उपक्रमाबाबत आभार मानून अशा शिबीरातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. या शिबीरात महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्यांना रस्ता सुरक्षा विषयक नियमांचे, वाहन चालवितांना घ्यावयाची काळजी, वाहतूक चिन्ह, हाताचे इशारे, हेल्मेट / सिटबेल्ट परिधान करण्याबाबत मार्गदर्शन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे यांनी केले.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी रस्ता अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींमध्ये दुचाकी स्वारांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान केल्यास हे प्रमाण नक्कीच कमी होईल. याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रत्येक सरकारी कार्यालयात नो हेल्मेंट नो इन्ट्री या अभियानाची माहिती दिली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपआयुक्त महानगर पालिका डॉ. पंजाबराव खानसोळे, अजित पालसिग संधू व सहा. मोटार वाहन निरीक्षक बालाजी जाधव यांनी परिश्रम घेतले.