नांदेड| नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांना नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने आज पी.एचडी.बहाल केली.
ललित लेखिका व कादंबरीकार कविता महाजन यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास या विषयात त्यांनी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय नांदेडच्या प्रा. संगीता घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन प्रबंध सादर केला.
सविता बिरगे या लोकाभिमुख आणि उत्कृष्ट कार्यशैली असणाऱ्या अधिकारी असून प्राथमिक शिक्षिका ते शिक्षणाधिकारी असा देदीप्यमान प्रवास त्यांनी केला आहे. शिक्षणाधिकारी म्हणून काम करताना मुलांच्या भावविश्वाशी समरस होऊन त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.
कार्यदक्ष आणि उत्कृष्ट अधिकारी म्हणून त्यांनी उत्तम काम केले आहे.त्यांच्या या संशोधन कार्यामुळे अनेक शैक्षणिक प्रयोगांना उत्तेजन मिळणार आहे. विविध प्रशासकीय अधिकारी, जिल्हा परिषदांचे अधिकारी, कर्मचारी, अनेक शिक्षकांनी त्यांचे या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.