हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातील बोरी - उमरखेड रस्त्यावरील पांडवकालीन कनकेश्वर तलावाच्या काठावर असलेल्या इच्छापूर्ती श्री वरद विनायक आणि श्री कनकेश्वर महादेव मंदिराच्या कलशारोहन सोहळा दि.२४ सॊमवरच्या शुभमुहूर्तावर बालयोगी व्यंकटस्वामी महाराज, दत्त संस्थान पिंपळगावकर आणि संतश्री देवगिरी गुरु आनंदगिरी महाराज यांच्या उपस्थित होम - हवन, अभिषेक - महापुजेने थाटात संपन्न झाला. यावेळी आ.माधवराव पाटील जवळगावकर, माजी आ.नागेश पाटील आष्टीकर आदींसह अनेक मान्यवर व महिला - पुरुष भक्तांनी धार्मिक कार्यक्रमास उपस्थिती लावून शोभा वाढविली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील भाविक भक्तांच्या इच्छापूर्ण करणाऱ्या श्री वरद विनायक आणि श्री कनकेश्वर महादेव मंदिराच्या कलशरोहनचा कार्यक्रम कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्या महत्वपूर्ण कलशारोहनच्या कार्यक्रमाला बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि गणेश भक्त व गावकऱ्यांच्या सहभागाने योग्य जुळून आला. त्यासाठी गेल्या महिन्याभरापासून या उत्सवाची तयारी सुरु होती, तो सुवर्णयोग आल्याने काल दि.२४ रोजी शहरातील मुख्य रस्त्याने कलशाची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती.
आज दि.२५ सोमवारी कलशारोहणाचा मुहूर्त ११ वाजता ठरल्यामुळे सकाळी ८ वाजता बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांचे शहरात आगमन झाले. यावेळी ढोल तसे, टाळ मृदंग आणि फटाक्याच्या अतिशबाजीत महाराजांचे जंगी स्वागत झाल्यानंतर वरद विनायक मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवुकीत शहरांसह ग्रामीण भागातील महिला, पुरुष, भजनी मंडळी आणि बालगोपाल मोठ्या उत्साहाने सामील झाले होते. मंदिराच्या ठिकाणावर आगमन झाल्यानंतर बालयोगी व्यंकटस्वामी महाराज, दत्त संस्थान पिंपळगावकर आणि संतश्री देवगिरी गुरु आनंदगिरी महाराज यांनी श्रीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा आदर सत्कार करण्यात आला.
यावेळी पाच कुटुंबाच्या वतीने होम - हवन, अभिषेक - महापुजा ११ ब्रम्हवृन्दनच्या मधुर वाणीत करण्यात आली. यावेळी हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया.. च्या नामघोषात कलशाची स्थापना शहरातील धाडसी युवकांच्या हस्ते करण्यात आली. त्यांनतर महाआरतीनंतर महाप्रसादाने कलशारोहन उत्सवाचा समारोप करण्यात आला. दरम्यान आ. माधवराव पाटील जवळगावकर, माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांचाही मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी महावीरचंद श्रीश्रीमाळ, भास्कर चिंतावार, शांतीलाल श्रीश्रीमाळ, दिलीप लोहरेकर पाटील, रामराव पाटील, रामराव सूर्यवंशी, प्रकाश कोमावार, संगणवार सावकार, डॉ.राजेंद्र वानखेडे, राम पाकलवार, मारोतराव लूमदे, शरद चायल, संजय माने, कुणाल राठोड, गजानन चायल, अनिल भोरे, धम्मपलवार सावकार, दिनू महाराज विरसनीकर, रामभाऊ ठाकरे, विकास पाटील देवसरकर, सुभाष राठोड, आशिष सकवान, रामभाऊ सूर्यवंशी, सुभाष शिंदे, जनार्धन ताडेवाड, विठ्ठल ठाकरे, राम नरवाडे, गजानन मुत्तलवाड, संतोष वानखेडे, ज्ञानेश्वर शिंदे, पिंटू चिंतावार, पांडुरंग तुपतेवार, प्रवीण कोमावार, प्रकाश रामदिनवार, रमेश डांगे, रामदास रामदिनवार, परमेश्वर भोयर, जितू सेवनकर, नागोराव शिंदे, देवीदास शिंदे, नागेश गुंडेवार, लताताई मुलंगे, मथुराबाई भोयर, सुनंदा दासेवार, नागमणी रामदिनवार, ज्योतीताई पार्डीकर, हरडपकर बाई, पळशीकर बाई, ऋघे मैडम, मेरगेवाड बाई, आदींसह शहर व पंचक्रोशीतील परिसरातील महिला मंडळी, युवक आणि भजनी मंडळी आणि स्वयंसेवक उपस्थित होते.