भाजपच्यावतीने अन्नत्याग आंदोलनाचा इशारा -NNL


नांदेड|
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महानगर जिल्हाध्यक्ष  प्रवीन साले यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी मोर्चा महानगर सरचिटणीस अमोल श्रीराम कुलथीया  हे जिल्ह्यातील अवैध  धंदे व बेकायदेशीर शास्त्र धारक यांच्यावर सात दिवसात कारवाई करण्यात यावी अन्यथा अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल हा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

नांदेड दिनांक २१ एप्रिल भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर नांदेड बचाव अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात चालू असलेले अवैद्य धंदे रेती, मटका, जुगार, ह्यामुळे कित्येक संसार उदध्वस्त होत आहे. हे लवकरात लवकर बंद करावे तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, रेती वाहतूक, खुनाचे प्रकरण, मटके, जुगार आदी अवैध धंदे सुरु आसताना पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष होत आहे असे भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रवीण साले यांनी वक्तृत्व केले आहे. 

तसेच लवकरात लवकर या अवैध धंदे बंद केले तर गुन्हेगारीला आळा बसेल प्रशासनाने ही कारवाई सात दिवसात करावी अन्यथा भाजपच्या वतीने अण्णा त्या करत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांनी दिला. या आंदोलनात अल्पसंख्याक मुस्लीम महिलांनी पाठिंबा दिला. यावेळी अनिल हजारी, दिलिपभाऊ ठाकुर,  सागर प्रेमकुमार जोशी, संदीप छापरवाल, मनोज जाधव, बजरंग ठाकुर, शततारकाताई पांढरे, शेख सुल्ताना बेगम, शेख ताहेरा बेगम, शेख सबीया बेगम, शेख नसिम बेगम आदी या अवैध धंद्यान मुळे त्रस्त असलेले महिला भगिनी उपस्थित होत्या

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी