महावितरणने दिला ग्राहकांना बिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा शॉक -NNL


हिमायतनगर,अनिल मादसवार 
| मार्च महिन्याच्या वीज बीलांसोबत महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बील दिली आहेत. त्यामुळे ग्राहक वर्गात यामुळे नाराजी पसरली असून, अगोदरच लोडशेडिंगमुळे ग्राहक वर्ग मेटाकुटीला असताना आता बिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्याचा शॉक दिला आहे. 

महावितरण कंपनीचे वेगवेगळे नियम आणि रिडींगमध्ये होणारे गोंधळ, सक्तीची वसुली यामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या महावितरणने आणखी ग्राहकांना जबरदस्त शॉक दिला आहे. भर उन्हाळ्यात ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा शॅाक दिल्याने ग्राहकांना सध्याच्या एका महिन्याच्या वीजबिला अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्याचे देयके देण्यात आली आहेत. गतवर्षी अनेक ग्राहकांनी सुरक्षा ठेव जमा केली तीच असताना आणखी नव्याने सुरक्षा ठेव घेऊन महावितरण काय सध्या करण्याचा प्रयत्न करतेय असा सवाल वीज ग्राहकातून विचारला जात आहे. 

दोन वर्षाच्या काळात कोरोना महामारीमुळे सर्वानाच आर्थिक संकटात टाकले आहे. त्या संकटाटाऊन सावरताना नाकी नऊ येत असताना महागाईचा भडका उडाला आहे. त्यामुळे अनेक सर्वसामान्य कुटुंबाना घरगड चालविताना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असताना महावितरणने सेक्युरिटी डिपॉझीटच भार टाकला आहे. यामुळे वीज ग्राहक व्दिधा मनस्थितीत सापडला असून, नियमित वीजदेयके भारत असताना सुद्धा सुरक्षा ठेव का..? भरावी असा सवाल उपस्थित करत आहेत. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी