डॉ. बाबासाहेबांची जयंती बॅनर वर नाहीतर आचरणातून करणे काळाची गरज- डॉ. प्रकाश मोगले -NNL

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन


नांदेड|
सामाजिक न्याय विभागाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात नांदेड येथील विचारवंत डॉ. श्री प्रकाश मोगले यांचे व्याख्यान झाले.  त्या प्रसंगी बोलताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विविध पैलू आणि त्यांनी विविध क्षेत्रातील केलेले उल्लेखनीय काम या बाबत सविस्तर माहिती दिली.   

यावेळी बोलतांना जयंतीला नुसते झेंडे मिरवून आणि मोठ्या मोठ्या बॅनरवर बाबासाहेबांचे शेजारी बसण्याची ज्यांची प्राज्ञा नाही त्यांनी आपले चित्रविचित्र फोटो बाबासाहेबांच्या फोटो शेजारी लावून बॅनरवर जयंती साजरी करण्यापेक्षा, विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेबांसारखे हुशार बनुन त्यांना अभिवादन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केले ते सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी बोलत होते.     

सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त तेजस माळवदकर यांच्या पुढाकाराने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ  प्रकाश  मोगले यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी समाज कल्याण अधिकारी व प्रसिद्ध कवी बापू दासरी होते. यावेळी सहायक आयुक्त तेजस माळवदकर, ज्येष्ठ समाज कल्याण अधिकारी लातूरचे अशोक गोडबोले, समाज कल्याण निरीक्षक दतहरी कदम यासह मान्यवर उपस्थित होते 

प्रास्ताविकात सहायक आयुक्त माळवदकर यांनी विविध योजना प्रभावीपणे राबवून त्याला लाभ गरजवंताना देण्यासाठी सामाजिक विभाग अग्रेसर असते. असे सांगताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारे सामाजिक समता निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी काम करावे व डॉ बाबासाहेब यांचा विचार अंगिकारावे तसेच  सामाजिक समता कार्यक्रम 2022 मधील उपक्रमांच मागोवा घेतला  त्यांनी घेतला.

अध्यक्षीय समारोपात कवी, समाज कल्याण अधिकारी कवी बापू दसरी यांनी जयंतीच्या मुहूर्तावर विद्यार्थ्यांनी मी कधीच कॉपी करणार नाही व तहहयात मी आई वडिलांना कधीच अंतर देणार नाही व त्यांचे मनोभावे सेवा करीन अशी शपथ विद्यार्थ्यांना दिली. लातूर येथील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक अशोक गोडबोले, यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अर्थशास्त्री म्हणून ओळख करून दिली.    सूत्रसंचालन गजानन पांपटवार, (तालुका समन्वयक) यांनी तर आभार प्रदर्शन ,समाज कल्याण निरीक्षक, दत्तहरी कदम  यांनी केलेकार्यक्रमाची सुरुवात फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण झाली. या कार्यक्रमास समाज कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी