नांदेड| येथील सुप्रसिद्ध इंग्रजी माध्यमाची ग्यानमाता विद्याविहार या शाळेच्या प्रशासना विरुद्ध सहशिक्षक विनोद रंगनाथराव गोस्वामी यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत त्यांनी पत्र लिहून शाळेच्या प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली होती. पण शाळेच्या प्रशासनाने त्याची कोणतीही दखल घेतली नाही. आणि त्यांच्या पत्रास केराची टोपली दाखवली. यामुळे सदरील बाब जिल्हाधिकारी यांना त्यांनी पत्राद्वारे कळवली आणि त्यावर निर्णय न झाल्यास 21 एप्रिल 2022 पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मागील काही वर्षापासून शाळेच्या व्यवस्थापनाचा अनागोंदी कारभार चालल्याचे दिसून येत आहे यामुळे जिल्हा परिषद प्रशासनानेही शाळेच्या विरोधात नियम भंग केल्याच्या तक्रारींची दखल घेऊन शाळेच्या व्यवस्थापनास परिपत्रकाद्वारे तंबी देखील दिली होती.