अवघ्या काही दिवसावर मुलीचा लग्नसोहळा असल्याने भाजपातर्फे तातडीने आर्थिक मदत दिली
हिमायतनगर| काल रेल्वे अपघातात निधन झालेल्या राऊत कुटुंबीयांची भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी भेट देऊन सांत्वन केले. तसेच मयत युवकाच्या मुलीचा विवाह सोहळा अवघ्या काही दिवसावर असल्याने तातडीने आर्थिक मदत देऊन काही अडचण आल्यास संपर्क करा. आम्हीं व आमचा संपूर्ण भाजप परिवार तुमच्या सोबत आहे असे म्हणत धीर दिला आहे.
तालुक्यातील मौजे सवना (ज)येथे सार्वजनिक विवाह मेळावा मध्ये भारतीय जनता पार्टीचे बुथ प्रमुख विशाल अंगुलवार यांच्या विवाह प्रसंगी भारतीय जनता पार्टी नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी विवाह सोहळ्यास भेट दिली. काल हिमायतनगर रेल्वे स्टेशन येथे सवना(ज) येथील शेतमजूर गौतम गणपत राऊत हे नांदेड जाण्यासाठी चढत असताना अचानक रेल्वे चालु झाल्यामुळे रेल्वेमध्ये चढण्याच्या गडबडीमध्ये हात घसरून ते रेल्वे मध्ये आल्यामुळे यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या घरी येत्या चार-पाच दिवसात यांच्या मुलीचा विवाह सोहळा होता पण काळाने त्यांच्यावर घातल्यामुळे मोठी अडचण राऊत परिवार निर्माण झाली.
याबाबत भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान यांनी जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांना सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने मौजे सवना येथे स्वर्गीय गणपत राऊत यांच्या घरी जाऊन मुलगी उज्वला गौतम राऊत व परिवाराची भेट घेऊन तातडीने आर्थिक मदत केली. तसेच या संदर्भात काही अडचण असल्यास आपण आमच्या हिमायतनगर भाजपाचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान यांच्याकडे संपर्क करावे असेही व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी राऊत परिवारास सांगितले.
यावेळी ओबीसी जिल्हा चिटणीस अंबाराव संगनोड, सोनारीचे सरपंच सुधाकर पाटील सोनारीकर, परमेश्वर गोपतवाड, अशोक अंनगुलवार, शहाजी जाधव, ठोणेकर, राजेश्वर हंडे, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष राम सूर्यवंशी, वामनराव मिराशे पाटील, परशुराम विठलवाड, कल्याणसिंग ठाकूर, बंडु रामा राऊत, दत्ता संगनवाड, संतोष डांगे, प्रमोद भुसाळे यावेळी उपस्थित होते.