नायगाव, दिगंबर मुदखेडे| होट्टलच्या धर्तीवर - राहेर येथील तिर्थक्षेत्राचा विकास व्हावा यासाठी केंद्र सरकारकडे निवेदनाद्वारे शंभर कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली. तशा मागणीचे निवेदन नांदेड येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष धनंजय देशमुख, उपसरपंच व्यंकटराव पाटील, भाजपाचे संजय पाटील, विजय केशटवार आदींची उपस्थिती होती.
राहेर हे देवाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाते, परंतु वस्तुस्थिती पाहता येथील तीर्थक्षेत्राचा विकास आजतागायत म्हणावा तसा झाला नाही. येथील पवित्र गोदाकाठी, प्राचीन हेमाडपंती नृसिंह मंदिर, महानुभावांचे दत्त मंदिर, संत बाळगीर महाराज मंदिर, खडक्या नृसिंह मंदिर आदी मठ व मंदिरे असून, पर्यटक, भाविक भक्तगण व शिष्यगणांची मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी व दर्शनासाठी गर्दी असते.
प्राचीन कालीन कला वैभवाचे जतन करण्यासाठी व होट्टलच्या धर्तीवर या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाकडे निवेदनाद्वारे शंभर कोटींच्या निधीच्या मागणी करण्यात आली. त्या मागणीचे निवेदन व नृसिंह मंदिराचा फोटो नांदेड येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांना देण्यात आले. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष धनंजय देशमुख, उपसरपंच व्यंकटराव पाटील, भाजपाचे संजय पाटील, विजय केशटवार आदींची उपस्थिती होती.
होट्टल ता देगलूर येथे दरवर्षी सास्कृतीक म्होस्तवाच्या स्वरूपात खूप मोठा कार्यक्रम प्रशासनाच्या वतीने घेण्यात येतो.राहेर हे गाव पवित्र गोदावरी नदीच्या काठावर असून तिर्थक्षेत्राचे माहेरंघर आहे भव्य हेमाडपंथी नृसिव्ह मंदिर, महानुभाव पंथीयांचे महान क्षेत्र तर दत्त पंथीय यांचे श्रद्धास्थान बाळगीर महाराज यांची जन्म भूमी आहे.
येथे वर्षातून एकदा तरी प्रशासनाने म्होस्तवाच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करून येथे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन या भागातील जनतेची सांस्कृतीक भूक पुरवावी अशी मागणी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कडे मराठवाडा कला परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पांडे यांनी केली आहे.