इसापूर धरणातून तात्काळ पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडून जणावरांसह मानवाची तहान भागवा - बाबूराव कदम कोहळीकर -NNL

इसापूर धरण १०० टक्के भरलेले असताना दयाप पाणीपाळी सोडली नाही 

नांदेड/हिमायतनगर/हदगाव, अनिल मादसवार| विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी डिसेंबर  महिन्यापासून कोरडी पडल्याने नदी काठावर अवलंबून असलेल्या गावकऱ्यासह जनावरांना पाण्याची भटकंती करावी लागत आहे. असे असताना देखील अद्यापही इसापूर धरणातून पैनगंगेच्या नदीपात्रात पाणी सोडण्यात आले नाही. इसापूर धारण १०० टक्के भरलेले असल्याने तात्काळ जणावरांच्या आणि नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांसाठी पाणी सोडण्यात यावे. अशी मागणी शेतकरी नेते तथा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांच्याकडे केली आहे.  

उमरखेड - हदगाव - हिमायतनगर तालुक्याच्या मधून वणारी पैनगंगा नदीकाठावर अवलंबून असलेल्या शेकडो गावकर्यांना यंदा डिसेंबर महिन्यापासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. आजघडीला पैनगंगा नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. पाणी टंचाई लक्षात घेता ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प आणि संबंधित जिल्हाधिकारी यांची इसापूर धारण १०० टक्के भरलेलं असल्याने पाणी सोडणे आवश्यक होते. मात्र या बाबतीत प्रश्नाने दुर्लक्ष केल्याने पाणी टंचाईच्या झळा नदीकाठावरील ग्रामस्थांना सहन कराव्या लागत आहेत. 


यंदा खरीप हंगामात वरून राजाने शेवटच्या टप्प्यात जोरदार हजेरी लावली मात्र नदीवर बंधारे नसल्यामुळे  पावसाचे पाणी पुढे वाहून गेल्याने नोव्हेंबर - डिसेंबर पासूनच नदी काठावरील गावकर्यांना भीषण पाणी टंचाई बरोबर जनावरांच्या चाऱ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. आजघडीला नाडीपठारत कुठंतरी डबक्यात अल्प प्रमाणात पाणी आहे. एवढ्या पाण्यावर नदीकाठावरील गावकरी व नागरिकांची आणि मुख्य जनावरांची तहान भागणे शक्य नाही. या प्रकारामुळे नागरिक, शेतकरी हतबल झाले असून, पाणी नाही, चारा नाही, म्हणून आपली जनावरे आठवडी बाजारात विक्रीला आणत आहेत. दरवर्षी पाण्याची मागणी विदर्भ मराठवाडा वासीयांकडून होत असते. त्यामुळे प्रशासनाने देखील पाणी टंचाईच्या बाबतीत पुढाकार घेऊन मंजुरी प्रमाणे पाणी पाळी सोडणे गरजेचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे नदीकाठावरील शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.

अनेक शेतकऱ्यांनी हि बाब लक्षात आणून दिल्याने शेतकरी नेते तथा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी इसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन याना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हंटले आहे की, नदीचे पात्र कोरडे पडले असून, मार्च महिना संपला असताना देखील पैनगंगा नदीपात्रात अद्याप एकही पाणी पाळी सोडण्यात आली नाही. यावर्षी इसापूर धारण १०० टक्के भरलेले असताना देखील नदीपात्रात जनावरांसाठी आणी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो आहे. परंतु प्रशासनाला याचे काही देणे घेणे नाही असा आरोपही त्यांनी केला आहे.

अनेक वर्षपासून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी शेतकरी-गावकरी नागरिकांना संघर्ष करावा लागतो आहे. ती वेळ पुन्हा येऊ नये यासाठी तातडीने इसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे असेही दि.०७ एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनात शेतकरी नेते तथा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी म्हंटले आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी