अर्धापूर| शालेय जीवनात लेखन व वाचनाची आवड निर्माण झाल्यास ती आयुष्यभर कायम राहते पुस्तक हे आपले खरे मित्र, मार्गदर्शक असुन ते कधीच धोका देत नाहीत.असे प्रतिपादन नगराध्यक्ष छत्रपती कानोडे यांनी शनिवारी (ता २३) यांनी केले.
शालेय विद्यार्थ्यांना वाचन व लेखनाची आवड निर्माण व्हावी यासाठी पुण्यजागर परिवारातील सदस्य दिनेश मुळे यांनी शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पुण्यातील भोई प्रतिष्ठानच्या वतीने अर्धापूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी पुण्यजागर प्रकल्प राबविण्यात येत आहे.
हे साहित्य नगराध्यक्ष छत्रपती कानोडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.यावेळी वर्षा मुळे,शताक्षी मुळे,वेदस्तू मुळे, प्रवीण देशमुख व्यंकटी राऊत डॉ विशाल ल़ंगडे, पंडितराव लंगडे , गुरुराज रणखांब, गोविंद माटे, गोविंद साखरे , नवनाथ ढगे, आदी उपस्थित होते.पुण्यजागर प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक लक्ष्मीकांत मुळे, गूणवंत विरकर रांची उपस्थिती होती.