नांदेड| नांदेड मध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्या च्या अनावरनानंतर आज पुतळा कृती समितीचा वतीने अभिवादन करून श्रेय घेणार्या काँग्रेस पक्षावर समितीच्या सदस्यांनी तीव्र शब्दात टीका केली.
राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा दिव्य सानिध्यात पुतळ्याचा भव्य असा मोर्चा काढला त्या मोर्चावर याच महापालिकेतील सत्ता धार्यांनी लाठी हल्ला केला हजारो समाज बांधवांचे रक्त सांडवले आणी आज त्याच काँग्रेस ला आज राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज आणी पुतळा कृती समितीचे दिवंगत अध्यक्ष प्रकाश कौडगे यांचा विसर पडला. राष्ट्रसंताचा फोटो कार्यक्रम पत्रकावर टाकन्याचे औदार्य सत्ताधाऱ्यांनी दाखवले नाही . पुतळ्यासाठी संघर्ष करनार्या कृती समितीचे दिवंगत अध्यक्ष प्रकाश कौडगे यांच्या नावाचाही उल्लेख पालकमंत्री यांनी केला नाही. त्यामुळे कृती समितीच्या वतीने निषेध करण्यात आला.
ज्या ज्या बांधवांनी पुतळ्याच्या लढ्यात केसेस अंगावर घेतल्या, रक्त सांडले तसेच कै. प्रकाशभाऊ कौडगे यांच्या कुटुंबीयांचा कृती समितीच्या वतीने 8 मे रोजी सत्कार करण्यात येणार असल्याचे समितीने जाहीर केले. यावेळी राष्ट्रसंत मिशनचे अध्यक्ष रामदास पाटील सुमठानकर यांनी कार्यक्रम महापालिके ने न करता काँग्रेस लिमिटेड केला या मुळे संकुचीत मानसीकता समाजासमोर आल्याची भावना व्यक्त केली. लिंगायत समाजाला कोणीही गोंजारू नये समाज कोणाची मक्तेदारी नाही असे वक्तव्य रामदास पाटील सुमठानकर यांनी केले.
यावेळी पुतळा कृती समितीचे सदस्य सुभाशिष कामेवार व शिवा नरंगले यांनी पुतळा अनावरण कार्यक्रम हायजॅक करणार्या काँग्रेस वर सडकून टिका केली. या वेळी समितीचे सदस्य तातेराव वाकोडे,नागनाथ स्वामी, गिरीश नारखेडे,हणूमंत पटणे,दत्ता शेंबाळे, दीपक स्वामी,सचिन पाटील, गोकुळ कौडगे, देवीदास डांगे, दत्ता डांगे, शिवा सोनटक्के, भूषण पेठकर, जितेंद्र महाजन, नागेश जनकवाडे, बालाजी भुरे, सुदर्शन कांचगीरे, विश्वनाथ देशमुख, अवतार सिंग पेहरेदार, अमोल भवानकर, वैभव सातापुरे, सोनू कल्याणकर, दया विभुते, शुभम स्वामी, नेहाल दासे, सुनील अनंतवार, दशरथ स्वामी या सहा अनेकांची उपस्थिती होती.