नांदेड| राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालक मंत्री माजी मुख्यमंत्री मा.ना.अशोकराव चव्हाण यांचे हात बळकट करण्यासाठी सांगवी येथील प्रतिष्ठित गावकऱ्यांचा माजी राज्यमंत्री मा.डी.पी सावंत यांच्या उपस्थित काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रभागाचे नगरसेवक प्रतिनिधी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष श्याम पाटील कोकाटे, युवक काँग्रेस महासचिव सत्यवान अंभोरे, राहुल भुक्तरे,सेवा सहकारी सोसायटी सदस्य विजय भुकतरे, संतोष भुक्तरे,प्रा. नारायण आंभोरे, युवक काँग्रेस प्रभाग अध्यक्ष गजानन पाटील कोकाटे, युवक काँग्रेस शाखा अध्यक्ष गणेश पाटील कोकाटे, सतीश कोकाटे आदी उपस्थित होते.
यावेळी डी.पी सावंत यांच्याशी गावकऱ्यांनी मुक्तसंवाद साधत मागील चार वर्षात सांगवीच्या विकासासाठी जो भरभरून निधी देत आहात त्यामुळे सांगवीचा कायापालट झाला आहे , या विकास कामाचा विचार करून आम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा भावना गावकर्यांनी व्यक्त केल्या. तसेच अजून आपण शासनामार्फत सांगवी च्या विकासासाठी साडेचार कोटी रुपये दिलात ती कामे लवकर सुरू होणार आहेतच. त्याबद्दल चव्हाण साहेबांचे आभार मानले, त्याचबरोबर गावात व प्रभागात श्याम पाटील कोकाटे हे अतिशय चांगले विकासात्मक आणि पक्ष संघटन वाढवणारे कार्य करत आहेत. प्रत्येकाच्या हाकेला ओ देणारा, सुख-दुःखात धावून येणारा, असा उच्चविद्याविभूषित व परिपूर्ण व्यक्तिमत्व असलेला नेता आम्हाला मिळाला आहे हे सांगवि गावचे भाग्यच आहे. त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहोत असे काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या काही लोकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या मध्ये गावातील जेष्ठ नागरिक पंडितराव पा. कोकाटे, संभाजीराव पा. कोकाटे, रामजी पा. कोकाटे,ज्ञानेश्वर पा.कोकाटे, प्रल्हाद पा.कोकाटे,सुनील पा.कोकाटे, तसेच नवयुवक प्रभू पा.कोकाटे, अशोक पा.पवार,चंद्रकांत पा. कोकाटे संतोष पा.कोकाटे (माली), सचिन रा. कोकाटे, संतोष पा, कोकाटे,सुधीर पा. कोकाटे, विलास पा. कोकाटे अजय पा. कोकाटे आधी चा समावेश होता. या सर्व गावकऱ्यांचे काँग्रेस पक्षांमध्ये मा. डी. पी. सावंत यांनी सहर्ष स्वागत केले , डी पी सावंत यांनी श्याम कोकाटे हा सच्चा व माझा विश्वासु कार्यकर्ता आहे. तुम्ही त्याच्या पाठीमागे उभे आहात व त्याच्या मागे मी व पक्ष खंबीरपणे उभे आहोत.
आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा अगदी योग्य निर्णय घेतला आहात, आपण आमच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस परिवारात आलात नक्कीच आपल्या कार्याची आम्ही नोंद ठेवून आपणासही विकासाची आणि नेतृत्वाची संधी देऊत, काँग्रेस पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचे कार्य करा नक्कीच याचा पक्षाला व पुढच्या पिढीला फायदा होईल. असे उपस्थितांना त्यांनी आवाहन केले सांगवी परिक्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्या मुळे सांगवी गाव पूर्णपणे काँग्रेसमय झालेल असून गावात व परिसरात काँग्रेसची ताकद निश्चितच वाढली आहे. याचा धसका विरोधकांनीही घेतला आहे.