तुप्पा सेवा सहकारी सोसायटीची बिनविरोध निवड; महाविकास आघाडीच्या ताब्यात -NNL


नवीन नांदेड।
नांदेड तालुक्यातील तुप्पा सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षाीक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या काँग्रेस,शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी समन्वयाची भुमिका बजावत हि सोसायटी बिनविरोध काढत तालुक्यात हि महाविकास आघाडी एकदिलाने काम करत असल्याचे दाखवुन दिले . सोसायटी बिनविरोध निकाली काढल्याबद्दल तुप्पा ग्रामस्थात जल्लोष साजरा करण्यात आला . 
  
नांदेड तालुक्यातील तुप्पा सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षाीक निवडणुक जाहिर झाल्यानंतर अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते . अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दि १९ एप्रिल रोजी गावातील महाविकास आघाडाच्या घटक पक्ष असलेल्या काँग्रेस , शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक घेवुन तुप्पा सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत होणारा खर्च टाळण्यासाठी सर्वच घटक पक्षाच्या नेत्याचे एकमत झाल्यानंतर हि निवडणुक बिनविरोध काढण्यात यावे असे ठराव बैठकीत पारित करुन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्यावतीने प्रत्येक जागेसाठी एक अर्ज ठेवत उर्वरित अर्ज मागे घेवुन हि निवडणुक बिनविरोध करण्यात आली . 
  
यात सर्वसाधारण गटातील आठ जागेसाठी  गोविंदराव नारायण चितळे , मारोती केरबाजी पवार , विनायक रामचंद्र बिरकले , एकनाथ गणपतराव कदम , देवराव शिवराम टिपरसे , रामराव महादजी कदम , सुधाकर शेषेराव पवार , भिमराव गुणाजी कदम याचे अर्ज राहिले होते .तर इतर आरक्षित जागेसाठी सारजाबाई नामदेव कदम ,चंद्रकलाबाई गंगाधरराव कदम ,किशन रामचंद्र पंडित ,आनंदा गंगाराम ढेपाळे , सुदर्शन लक्ष्मण नरवाडे याचे अर्ज होते. या तुप्पा सेवा सहकारी सोयटीच्या १३ जागेवर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रत्येक गटात एक एक अर्ज राहिल्याने ही निवडणुक बिनविरोध निघाली आहे .नांदेड तालुक्यात राज्यातील महाविकास आघाडीचा नविन पँटर्न सर्वच सेवा सहकारी सोसाटीवर पहावयास मिळत आहे .

तुप्पा सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध करण्यासाठी शिवकांत कदम , माजी जि .प .सदस्य शिवाजी कदम , प .स .सदस्य गंगाधर नरवाडे , दत्ता कदम , व्यंकटराव चितळे , महाजन कदम , चिमणाजी कदम , विठ्ठल टिपरसे , शेख चांदपाशा , बालाजी यमलवाड , मनोहर कदम, सुनिल पवार  यांनी परिश्रम घेतले .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी