यावेळी,माजी आ.हाणममंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर,माजी जि.प.सदस्य मोहन पाटील टाकळीकर,जि.प.सदस्य प्र.बबन पाटील गोजेगावकर,शिवसेना तालुका प्रमुख नागनाथ लोखंडे,काँग्रेस शहराध्यक्ष नंदकुमार मंडगुलवार, उपसरपंच सुहास पाटील टाकळीकर,विवेक पाटील टाकळीकर, महेश पाटील टाकळीकर,कृषी. उ.बा.समिती मुखेड संचालक दत्तात्रय पाटील,धनराज पाटील ग्रा.पं.सदस्य,माजी सरपंच खुशाल पाटील,केंद्र प्रमुख गजानन पाटील,म.रा.प्रा.शि.संघ जिल्हाध्यक्ष बंडू पाटील खतगावकर,शिक्षक गजानन पइतवार,शिक्षक सेना ता.अध्यक्ष पदमाकर जवळदापके,आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कै.लक्ष्मणराव कोटगीरे यांच्या शिक्षकीप्रवासात त्यांनी शेळगाव,बेटमोगरा,जाहूर येथील प्राथमिक शाळेत शिक्षक पदावर रुजू असून त्यांनी मोटरगा येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक या पदावर विराजमानही होते. कोटगीरे गुरुजी यांनी आपल्या आयुष्यातील अमुल्य वेळ आपल्या प्रिय विद्यार्थ्यांसाठी घालवत मौल्यवान ज्ञान आणि जिवनाचे महत्त्वपूर्ण धडे दिले होते. त्यासोबतच आपल्या शांत व प्रेमळ स्वभावाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली होती.तसेच त्यांनी विद्यार्थ्यांसह आपल्या घरातील मुलांच्याही मनात संस्काराची बिजे रोवून दोन मुलांना शिक्षक पदावर तर एका मुलाला पोलीस खात्यात विराजमान केले आहे.मात्र काळाच्या घाताने कै. लक्ष्मणराव कोटगीरे यांना हिरावून घेतला.
कै.लक्ष्मणराव कोटगीरे यांच्या दि.२७ एप्रिल २०२१ रोजी वयाच्या ८३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाल्याने कोटगीरे परिवारासह मित्र परिवारात सुद्धा दुख:च्या डोंगर पसरला होता.त्याच अनुषंगाने सालबादनंतर कोटगीरे गुरुजींच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात बेटमोगरा परिसरातील अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहुन अभिवादन केले.या कार्यक्रमानंतर ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी डि.के.मित्र परिवारासह अनेकांनी परिश्रम घेतले तर या कार्यक्रमात बेटमोगरा परिसरातील भजनी मंडळासह असंख्य ग्रामस्थ उपस्थिती होते.