पुण्यश्लोक अहिल्यादेवी वाचनालयात वाचक मेळावा संपन्न -NNL


नविन नांदेड।
१५ एप्रिल २०२२ रोज शुक्रवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी सार्वजनिक वाचनालय होळकर नगर सिडको नांदेड येथे चक्रवर्ती सम्राट अशोक, महात्मा जोतीराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त " वाचन संस्कृती व समाज प्रबोधन "  मेळावा  कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.नरहरी कुंभारगावे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. 

अध्यक्षिय भाषणात मार्गदर्शन करताना प्रा. कुंभारगावे म्हणाले सम्राट अशोक यांनी भारतात सिध्दार्थ गौतमानी निर्माण केलेला सत्यधर्म जागतिक स्तरावर नेवून समता निर्माण कशी केली यावर विचार मांडले. डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, महापुरूषांना डोक्यावर घेवून विकृती करण्यापेक्षा,महापुरूषाचे विचार डोक्यात घेवून प्रत्येक्ष आचरणात आणून कृतीत आणण्याची गरज आहे,तरच समाजात बंधूभाव ‌निर्माण होईल त्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी संविधान भारताला दिले असे प्रतिपादन केलें.

प्राध्यापक शिवाजी इंदूरे यांनी महात्मा फुलेनी केलेल्या शैक्षणिक क्रांती मुळेच आपण प्रगती करू शकलो आणि हजारो वर्षांपासून अडकलेल्या गुलामीतून मुक्त झालो. त्यानंतर डॉ.गणपत जिरोनेकर यांनी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब यांच्या जिवनावर प्रकास टाकले. गोविंदराव शूरनर यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाला केरबा जेटेवाड, नारायण अंबुरे,विनोद सुत्रावे, संजय पेठकर, विलास महाजन, नितिन सापनर,प्रकार पवार, गुंडेराव‌ वाडीकर, सावित्रा शूरनर,वसुंधरा शिरामे, बाबुराव केंद्रे, रावसाहेब गिते व इतर कार्यकर्ते हजर होते. शेवटी ग्रंथपाल मदनेश्वरी शूरनर यांनी आभार मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी