या शोभायात्रेची मुखेड तालुक्यात जय्यत तयारी होत असून विरभद्र मंदीर ते तेलीपेठ हनुमान मंदीर ते बसस्थानक या बाजारपेठतील मुख्य रोड वर भगवे पताके लावण्यात आले असून शहरातील संपुर्ण बाजारपेठ व मुख्य रस्त्याच्या दुतर्फा भगवे पताका लावण्या आले आहेत.
दिनांक ०२ एप्रिल रोजी दुपारी सायंकाळी ४ वाजता मुखेडचे कुलदैवत विरभद्र महाराज स्वामी मंदीर पासुन या यात्रेला सुरुवात होणार आहे. या भव्य शोभा यात्रेला तालुक्यातील सर्व हिंदु बांधव एकत्र येऊन आनंदाने गुढीपाडवा व हिंदु नववर्ष मोठया उत्साहात साजरा करत असतात. या शोभायात्रेस मोठया संख्येने उपस्थित रहावे असे मुखेड आवाहन विश्व हिंदु परिषद व बजरंग दल मुखेड च्या वतीने करण्यात आले आहे.