किनवट, माधव सुर्यवंशी| शहरातील श्री राम मंदिरात दरवर्षी प्रमाणे या हि वर्षी रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर श्री रामनवमी निमित्त नित्यनेमाने पुजा अर्चा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी श्री राम मंदिर संस्थान समितीच्या विश्वस्थांनी कार्यक्रमामध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदवला तर यावर्षी युवकांचा समावेश प्रकर्षाने जानवत होता. तसेच मागील १२ वर्षापासुन रामनवमी निमित्त भव्य महाप्रसाद भंडा-याचे आयोजन उपनगराध्यक्ष व्यंकट नेम्मानिवार यांच्या तर्फे करण्यात येत आहे त्याच अणुषंगाने त्यांनी आपली दानशुर वृत्ती याही वर्षी जोपासली असुन भव्य महाप्रसाद भंडा-याचे आयोजन केले होते, ज्याचा लाभ अनेक भाविक भक्तांनी घेतला.
सकाळ पासुनच राम नवमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये शहरात सकाळी १० वाजता भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर दुपारी १२ वाजता जन्मउत्सव साजरा करण्यात आला ज्यामध्ये महिला व बाळकांनी उत्सफुर्त सहभाग नोंदवला होता. तर दुपारी १ ते ५ अन्नदान भंडा-याचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये दुपारी ४ वाजता शहरातुन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावळी उपनगराध्यक्ष व्यंकट नेम्मानिवार यांच्या सह व्यंकट भंडरवार, व्यंकट सातुरवार, भुमन्ना कोलावार, संतोष यलचलवार, देवन्न काडेवार, गिरिष नेम्मानिवार, गजानन बंडेलवार, साहिल सिरमनवार यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला.