अर्धापूर| शहरातील अनेक ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला, यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.हिंदू गर्जना रॅलिने शहर दणाणून गेले.मगव्या पतका, शुभेच्छा फलक, यांनी शहरातील वातावरण राममय होवून गेले.
शहरातील श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने हिंदू गर्जना रॅलिचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीस शहरातील बसवेश्वर चौकातून सुरुवात झाली.ही मिरवणूक अहिल्यादेवी होळकर चौक, पोलिस ठाणे, डॉ बाबासाहेब आंबेडकरनगर बालाजी मंदिर मार्गाने जावून हनुमान मंदिर परिसरात सांगता झाली.समितीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील श्री बालाजी मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, किसन बापु देवाश्रम, गजानन मंदिर,साई बाबा मंदिर श्री राम मंदिर, श्रीराम नगर आदी ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.या निमित्ताने जन्म आध्यायाचे पठण, आरती, पुजा आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.श्रीराम नगररात सोमवारी सकाळी दहा ते बारा या वेळेत हभप पांडुरंग महाराज यांचे किर्तन होणार आहे.या किर्तना नंतर महाप्रसार वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती संयोजन समितीने दिली.