नवी दिल्ली येथील संसद भवन जवळील तालकटोरा इनडोअर स्टेडियम येथे दि.१४ एप्रील २०२२ रोजी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महाराष्ट्रातील काही व्यक्तींसह मुखेड तालुक्यातील डॉ.राहुल कांबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती पुरस्कार निवड पत्रकाद्वारे श्री.श्री.श्री.हवा मल्लिनाथ संस्थेचे संस्थापक तथा संपादक सिद्धार्थ तलवारे यांनी दिली आहे.
मुखेड तालुक्यासह नांदेड जिल्हाभरात पशुवैद्यकीय सेवा सह फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीमध्ये, मागील १० वर्षांपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने मुखेड शहरासह तालुकाभरा मध्ये १८ तास अभ्यासक्रम उपक्रम राबविणे,आणि पशुंची प्रामाणिक पणे सेवा करणे, तसेच सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय,क्रीडा यासह विविध सामाजिक कार्याची दखल घेऊन संस्थेने या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे. या निवडीबद्दल कर्मचारी संघटनेचे संस्थापक भारत वानखेडे , डॉ.उत्तमराव सोनकांबळे,संपादक भारत सोनकांबळे यांच्या सह जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.