नांदेड| दि.15 व 16 एप्रील 2022 या दोन दिवसाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्य इंडियाका संघ निवड चाचणी चे आयोजन आले होते. या संघ निवड चाचणीचे उद्घाटन माजी उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री डि. पी. सावंत साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
या वेळी जिल्हा इंडियाका असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रुपेश पाउमुख हे अध्यक्षस्थानी होते तर पाहूणे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार , राज्य संघटनेचे उपाध्यक्ष प्रविणकुमार कुपटीकर, सामाजीक कार्यकर्ते कैलास भाऊ सावते,क्रीडा मार्गदर्शिका शिवकांता देशमुख , राज्य संघटनेचे उपाध्यक्ष पी.जे. चाँद, इंडियाका असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव रविकुमार बकवाड , तायकांडो असोसिएशन चे सचिव बालाजी जोगदंड, स्क्वॅश संघटनेचे बाबुराव खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती या निवड चाचणी साठी महाराष्ट्र राज्यातून 12 जिल्ह्यातील 140 खेळाडूंनी सहभाग नोंदवला निवड झालेले खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करतील.
ही निवड चाचणी यशस्वी करण्यासाठी राज्य संघटनेचे सचिव रवीकुमार बकवाड, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सुहास कांबळे , शैलेश कूकडे , डॉ.अभिजित खेडकर ,ईश्वर नांदेडकर , विशाल कांबळे, वैभव शिंदे, महेश सातव, अनिकेत सरपाते , महेश तागले, समीर काजी , दिलीप सूर्यवंशी ,सचिन कांबले आदींनी परिश्रम घेऊन निवड चाचणी यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले. सदरील चाचणीद्वारे गुणवत्तेच्या आधारावर महाराष्ट्र राज्य इंडियाका संघ निवडण्यात आला.