नायगांव, दिगंबर मुदखेडे। नायगाव तालुक्यात प्रत्येक गावात हनुमंतरायाचे मंदिर असून त्याठिकाणी संकट मोचक हणमंत रायची पूजा अर्चा करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी सकाळी मंदिरे भक्तीभावाने फुलून गेली होती. काही ठिकाणी गावभर मिरवणूक काढण्यात आली तर काही ठिकाणी हनुमान चलीसाचे पठण करण्यात आले.
नायगाव पंचक्रोशीत सुजलेगाव येथिल हनुमान मंदिर देवस्थान पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. मंदिराच्या भव्य पटांगणात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हनुमान जन्मोत्सवानिमित्त साजरा करण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील भक्तगण सकाळी सकाळी सूजलेगाव मध्ये दाखल झाले होते. त्यानंतर गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
सुजलेगावची हनुमान जयंती संपुर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध,गावकरयांचा सर्वात मोठा सण.विशेष म्हणजे राजकीय वैर सगळं काही विसरून१८पगड जाती ऐकत्र येऊन. ह्या दिवशी गावचा प्रत्येक व्यक्ती जिथं असेल त्या कानाकोपऱ्यातून जन्मभुमीत येतात.मित्र-सवंगडी,सगे-सोयरे वर्षानुवर्षानंतरच्या सर्वांच्या भेटी.बालपणीचे शाळेचे संवंगडी जुन्या आठवणींना नविन उजाळा. ह्याला आम्ही ऊत्सव म्हणतो.दररोज नविन किर्तनकार, महाप्रसाद जवळपास ८ दिवस चालतो.घरोघरी दारावर रांगोळी, पाहुणे,पुर्ण गाव गजबजलेला असतो.
महारूद्र मित्रमंडळाचे युवक सर्वांचे भगवे टि शर्ट वेशभूषा,गावात पताके,मंदीराची स्वच्छता,शिखराची रंगरंगोटी विशेष म्हणजे अख्या गावावर चमकणारी मंदिराची लाईटिंग,पालखी, लेजीम टाळ मृदंग ढोलताशांच्या गजरात ग्राम प्रदक्षिणा, हाईल त्यानंतर साखर प्रसद्दाचे आयेाजन केलें आहे,वाघांचा कार्यक्रम ,शेवटच्या दिवशी नाट्य,पोवाडे व तसेच संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन असते. 17/04/2022 रोजी.सकाळी पाच वाजता भव्य अशी मिरवणूक 5 ते 08 त्यानतंर ह.भ.प. दिगंबर महाराज गडगेकर महाराज यांचे काल्याचे किर्तन व सायंकाळी 5 ते 6 वाघाचा कार्यक्रम व त्याच प्रमाणे सायंकाळी 8 ते 11 रात्री शाहीर दिगु तुमवाड यांचा संच व कलाकार शाहिर बळिराम जाधव यांचा भरगच्च व मनोरंजन कार्यक्रम होणार असून, दररोज महाप्रसाद होणार आहे. तरी परिसरातील भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावे कार्यक्रमाचे आयोजन गावकऱ्यांच्याा वतीने केले आहे असे आवाहन समस्त गावकरी मंडळ श्री महारुद्र हनुमान मंदिर ट्रस्ट सुजलेगाव याच्या वतीने करण्यात आले आहे.